Dilip Walse Patil  Sarkarnama
पुणे

Walse Patil News : मला ईडी, सीबीआयची नोटीस नाही, पण ‘या' कारणांमुळे अजितदादांसोबत गेलो; वळसे पाटलांनी भूमिका केली स्पष्ट

काही राजकीय घडामोडींमुळे नवीन राजकीय समीकरणे तयार झाली आहेत.

डी. के. वळसे पाटील

Ambegaon NCP News : डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा प्रयत्न झाल्यास आंबेगाव, जुन्नर, शिरूर व पारनेर तालुक्यांतील ६५ बंधारे पाण्याअभावी कोरडे पडण्याचा धोका हेाता. परिणामतः शेतीमुळे आलेली समृद्धी धोक्यात येईल. पाच साखर कारखाने अडचणीत येतील. पण, या भागातील जनतेचा विचार करूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची कुठलीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे विनाकारण अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. (I have no notice from ED, CBI or Income Tax: Dilip Walse Patil)

राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर वळसे पाटील (Dilip walse patil) हे प्रथमच आंबेगाव तालुक्यात आले हेाते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मंचर येथे रविवारी (ता. ९ जुलै) मेळावा घेण्यात आला. त्यात वळसे पाटील बोलत होते. आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातून मोठा जनसमुदाय या वेळी उपस्थित होता. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने कार्यालयाच्या बाहेर स्क्रीन लावण्यात आली होती.

वळसे पाटील म्हणाले की, मी जे आज घडलो आहे. तसेच जो विकास झाला आहे. तो ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांच्यामुळेच झाला आहे. त्यांच्या विरोधात आपली लढाई नाही. त्यांच्याविषयी काल जो आदर होता. तो कायम राहणार आहे. काही राजकीय घडामोडींमुळे नवीन राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. आपण भाजपमध्ये प्रवेश केला नाही. राष्ट्रवादी पक्ष (NCP) वेगळा राहणार आहे. मी सातवेळा निवडून आलो. न मागता किंवा शिष्टमंडळ न भेटता माझ्यावर उच्च व तंत्रशिक्षण, उर्जा, वैद्यकीय शिक्षण, अर्थ, विधानसभा अध्यक्ष, कामगार व उत्पादन शुल्क, गृह आदी जबाबदारी पक्षाने सोपविली. ती मी समर्थपणे पार पाडली.

एकदा जिल्हा परिषदेच्या कमी जागा आल्यामुळे मला मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितला. मी कुरकुर न करता राजीनामा दिला. मतदार संघातील कामे होत नाहीत. याबाबत पक्षातील ३५-४० आमदारांनी तक्रार केली होती. ही तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांच्या कानावर घातली होती. त्यांनी पवारसाहेबांबरोबर चर्चाही केली होती. दोन-तीन दिवसांत निर्णय करतो, असे सांगितले. पण निर्णय झाला नाही. अखेर बहुसंख्य आमदारांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले.

वळसे पाटील म्हणाले की, देवेंद्र शहा यांचे वडील प्रकाश शहा व माझे वडील माजी आमदार (स्व.) दत्तात्रय वळसे पाटील हे शरद बँकेचे संस्थापक आहेत. तीन पिढ्यांपासून आमचे कौटुंबिक संबंध आहेत. माझी किंवा माझ्या कुटुंबतील कोणत्याही सदस्याची देवेंद्र शहा यांच्या पराग मिल्क फुड्स प्रा. लि. कंपनीत एक रुपयाचीही गुंतवणूक किंवा कोणत्याही प्रकारची भागीदारी नाही. मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आलेली नाही. त्यामुळे विनाकारण चुकीची माहिती देऊन जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT