Pune News : काँग्रेसमधील काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला पक्षातून बाहेर ढकलून दिलं आहे. पण, आमच्या रक्तात आणि विचारातच काँग्रेस आहे. माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये २०३० मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. काही लोकांनी आम्हाला पक्षाबाहेर ढकलून दिलं असेल तर मला असं वाटतंय की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत बोलावलं पाहिजे आणि ती जबाबदारी पक्षश्रेष्ठींची आहे. पण, आतापर्यंत अशी कुठलीही हालचाल झालेली नाही, असे आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले. (I was targeted and pushed out of Congress: Satyajeet Tambe)
पुण्यात माध्यमाशी बोलताना पदवीधर निवडणुकीच्या वेळी घडलेल्या घटनेबाबत सत्यजित तांबे यांनी पुन्हा भाष्य केले. ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या काळात जो काही इपिसोड झाला, तो आपल्या सर्वांच्या समोर आहे. कशा पद्धतीने माझ्यावर राजकारण झालं आणि कशा पद्धतीने मला काँग्रेस पक्षातून बाहेर ढकलण्यात आलं.
मीच एकटा नाही तर देशात चांगलं काम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांना ठराविक ठिकाणी टार्गेट करून करून पक्षाच्या बाहेर ढकलण्यात येतं. ही चिंतेची बाब आहे. त्यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करण्याची गरज आहे, असेही खडे बोल सत्यजित तांबे यांनी सुनावले.
तांबे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत विषय आहे. किती लोकांवर कारवाई करायची, किती लोकांवर कारवाई करायची नाही. ती का करायची आणि का नाही करायची, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
दोन धर्मांमध्ये, दोन जातीत आणि दोन पंथांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोंविदाने राहतात, हा इथला इतिहास आहे, असेही त्यांनी ‘लव्ह जिहाद’ वरून विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
आमदार तांबे म्हणाले की, कुरघोडीच्या राजकारणामुळेच आता नव्या तरुणांनी राजकारणात यायला हवं. नव्या राजकारणाची सुरुवात करण्याची आवश्यता आहे. ते नवं राजकारण चालू करत असताना युवकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.