Abhijeet Chaudhari 
पुणे

IAS Transfer: PMRDAची जबाबदारी IAS अभिजीत चौधरी यांच्यावर! महानगर आयुक्त योगेश म्हसे यांची घेणार जागा

IAS Transfer: ही नियुक्ती निवड श्रेणीत अवनत करुन करण्यात आल्याचं महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भातील काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

सरकारनामा ब्युरो

IAS Transfer: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महानगर आयुक्तपदी IAS अधिकारी अभिजीत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडील पदभार ते स्विकारतील. ही नियुक्ती निवड श्रेणीत अवनत करुन करण्यात आल्याचं महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भातील काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. अभिजीत चौधरी हे सध्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत होते.

शासनानं काढलेल्या या बदली आदेशात म्हटलं की, शासनानं आपली बदली केली असून, आपली नियुक्ती महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर झाली आहे. भाप्रसे योगेश म्हसे यांच्या जागी ते पद निवड श्रेणीत अवनत करुन केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार भाप्रसे डॉ. विपीन झटणकर यांच्याडं सोपवावा आणि त्वरीत नवीन पदाचा कार्यभार स्विकारावा.

दरम्यान, शासन आदेशाचा अर्थ असा की नागपूर महापालिका आयुक्त म्हणून सध्या जाबबादारी सांभळत असलेल्या अभिजीत चौधरी यांची पुण्याच्या पीएमआरडीएमध्ये आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्याकडं देण्यात आली आहे. त्यामुळं इटणकर यांच्यावर नागपूर महापालिकेची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT