Iran-Israel War: इराणला इस्रायलची खुली धमकी; नवा सर्वोच्च नेता ‘हिट लिस्ट’वर? नेमकं काय म्हटलंय?

Iran-Israel War: अमेरिका आणि इस्रायलनं मिळून इराणविरोधात युद्ध पुकारलं असून गेल्या तीन दिवसांपासून सातत्यानं हल्ल्यांची मालिका अद्यापही सुरुच आहे.
Israel US Iran War
Israel US Iran WarSarkarnama
Published on
Updated on

Iran-Israel War: अमेरिका आणि इस्रायलनं मिळून इराणविरोधात युद्ध पुकारलं असून गेल्या तीन दिवसांपासून सातत्यानं हल्ल्यांची मालिका अद्यापही सुरुच आहे. या दोन्ही देशांनी केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं देखील इस्रायलवर हल्ले सुरु केले आहेत. त्याचबरोबर ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे सैन्यतळ आहेत तिथंही क्षेपणास्र डागली आहेत.

यामुळं युद्ध चांगलंच पेटलं असून त्यातच इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादच्या मदतीनं अमेरिकेनं इराणचे सुप्रीमो अयातुल्ला अली खोमेनी यांचा त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना हल्ल्यात ठार केलं. यामुळं इराण आणखीनंच चवताळला असून आता खोमेनी यांचा उत्तराधिकारी देखील निश्चित केला आहे. तर दुसरीकडं इराणला इस्रायलनं पुन्हा उघड धमकी दिली असून इराणचा नवा सर्वोच्च नेताही आमच्या हिटलिस्टवर असल्याचं म्हटलं आहे.

Israel US Iran War
MVA Rajya Sabha Candidate: राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला! 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब?; काँग्रेसच्या बड्या नेत्याची माहिती

इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची इराणला ही खुली धमकी दिली आहे. इराणचा नवा सर्वोच्च नेता इस्राईलच्या हिटलिस्टवर असेल असं ट्विट इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कार्ट्झ यांनी केलं आहे. जो कोणी इस्रायलच्या विनाशाचा कट रचेल त्या व्यवस्थेचं नेतृत्व करेल त्याला इस्रायल जिवंत सोडणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Israel US Iran War
Iran-USA War: आखाती देशात निर्यात महागली! इमर्जन्सी सरचार्ज लागू; कुठल्या वस्तूंना बसणार फटका? शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान

दरम्यान, अय्यातुल्ला खोमेनी यांच्या मुलगा मोजतबा हुसैनी याला आता इराणचा सुप्रीम लीडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. इस्रायलच्या माध्यमांनी ही माहिती दिली आहे. इराणमध्ये विशेष बैठक घेऊन खामेनेई यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्यात आली. इराणमधील हे सर्वात शक्तीशाली पद आहे. खरंतर इराण रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) दबावाखाली मोजतबा यांची निवड करण्यात आली असून याबाबत इराण सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com