Baramati Loksabha Politics : Sarkarnama
पुणे

Baramati Loksabha Politics : अमेठी गेली तर.. मग बारामती का नाही जाणार?

भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यभरात पदाधिकारी कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

अनुराधा धावडे

Baramati Loksabha Politics : बारामती लोकसभा मतदार संघात आम्ही यावेळी असा उमेदवार देऊ की त्यांना कळणारही नाही बारामती कशी गेली''.असं सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ( If Amethi goes.. then why not Baramati?)

भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यभरात पदाधिकारी कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. बारामती लोकसभेसाठी भाजपचं गणित काय आहे, तिथे भाजपने कशी तयारी केली आहे, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या ताकदीचा, त्यांच्या विरोधात लढणारा उमेदवार भाजपला अजून मिळाला आहे की नाही, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ''आम्ही अशावेळी उमेदवार देऊ की त्यांना कळणारही नाही बारामती कशी गेली. आमचा पक्ष वाढवण्यासाठी, आमचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही रणनीती आखत आहोत. पण शेवटी जनतेचा निर्णय आहे, त्यांनी सुप्रिया सुळेंना निवडून द्यायचं की भाजपच्या उमेदवाराला निवडून द्यायचं हा शेवटी जनतेचा निर्णय आहे. जर अमेठी जाऊ शकते तर बारामतीही जाऊ शकते. शेवटी तिथे त्यांचा पक्ष मजबूत आहे पण आम्हीही प्रयत्न करत आहोत. ज्या पद्धतीने आम्ही काम करतो. ज्या पद्धतीने चक्र फिरणार आहेत ते पाहता आम्ही बारामतीही जिंकू असा आमचा विश्वास आहे.''

भाजप (BJP) हा संस्कृती, मर्यादा पाळणारा पक्ष आहे पण भाजपमधील काही नेतेमंडळीच भाजपच्या संस्कृतीत न बसणारी वक्तव्ये करतात. त्यावेळी तुमच्या आणि इतर राजकीय पक्षातील नेत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल. या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, पक्षावर टिका होऊ शकते पण व्यक्तिगत टिका होऊ नये पण आता ती व्हायला लागली आहे. ती संपली पाहिजे, भाजपच्याही कार्यकर्त्यांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत की व्यक्तीगत टिकाटिपण्णीवर जाऊ नये, धोरणावर बोला. पक्षावर टिका करा पण व्यक्तीगत टिका करु नका, अशा सूचना मी त्यांना दिल्या,''असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

संजय राऊत यांची सकाळच्या पत्रकार परिषदा घेतात. अगदी थुंकीपर्यंत, एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं की त्यांच्या नावाने थुंकणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. इथपर्यंत आले तरी आमच्या लोकांनी आचारसंहिता पाळायच्या, उद्या जर राऊतांनी बोलणं बंद केलं तर नितेश राणेही बंद करतील. त्यामुळे माझी संजय राऊतांना (Sanjay Raut) विनंती आहे की, त्यांनी आता यातून बाहेर पडावं,'' तुम्ही सकाळच्या परिषदा बंद केल्या तर नितेश राणेंनाही आम्ही बोलणं बंद करायला सांगू असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT