Backward Classes Commission :  Sarkarnama
पुणे

Backward Classes Commission : राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात महत्त्वाची बैठक; संभाजीराजे घेणार भेट!

Chetan Zadpe

Pune News : मराठा आरक्षणावरून राज्यातलं राजकीय वातावरण पेटलेलं आहे. अशातच मराठा आणि ओबीसी नेते एकमेकांविरुद्ध टीका टिप्पणी करून आव्हान देत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी डेडलाइन दिली आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना या सर्व पार्श्वभूमीवर आता मागासवर्ग आयोगाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. मराठा समाज कोणत्या निकषावर मागास आहे, याची चाचपणी आयोग करणार आहे. (Latest Marathi News)

पुण्यात आज मागासवर्ग आयोगाची बैठक पार पडणार आहे. साधारण सकाळी ११ वाजता व्हीआयपी सर्किट हाउसमध्ये बैठकीला सुरुवात होत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार असल्याचे समजते आहे. आयोगाचे अध्यक्ष यांच्यासह १० सदस्य बैठकीत उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज मागासलेला आहे की नाही, याचीही शहानिशा केली जाणार आहे. दरम्यान, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती हेदेखील आयोगाची भेट घेऊन सल्ला मसलत करणार आहेत.

पुन्हा सर्व्हे होणार -

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा सखोल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कामासाठी तीन मोठ्या संस्थांची निवड झाली आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

राज्यभरात कुणबी नोंदी आढळून येत असल्याचे पाटील म्हणाले आहेत. आतापर्यंत २२०००० कुणबी नोंदी नव्याने आढळले आहेत. एक कुणबी नोंद शंभर - दीडशे जणांना प्रमाणपत्र मिळवून देण्यास साह्य ठरेल. ३० नोव्हेंबरनंतर ही समिती तेलंगण, हैदराबाद, आंध्र प्रदेशात जाऊन यासंदर्भात काम करेल, असेही पाटील म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT