Eknath shinde  Sarkarnama
पुणे

Maharashtra Cabinet Decisions : पुणेकरांसाठी खुशखबर! वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता..!

Maharashtra Cabinet Decisions for Pune: आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पुणेकरांच्या वाट्याला देखील एक आनंदाची बातमी आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी दोन दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पुणेकरांच्या वाट्याला देखील एक आनंदाची बातमी आली आहे. मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये पुण्यामध्ये नव्याने दोन मेट्रो मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे.

आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाल्याचं बोललं जात आहे. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक लोकप्रिय निर्णय सरकारकडून घेण्यात आले आहेत . त्या निर्णयामध्ये राज्य सरकारने मुंबईला बंपर गिफ्ट दिले आहे. मुंबई लगत असलेले पाचही टोलनाके हलक्या वाहनांसाठी मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक प्रकारे मुंबईकरांना दिवाळीच्या तोंडावर टोलमुक्तीचं गिफ्ट मिळालं असल्याचं पाहायला मिळत आहे.

तर इकडे पुणेकरांसाठी देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यात आणखी नवे दोन मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहेत. पुणे शहराला आता खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग असा मेट्रोमार्ग भेटणार आहे. सरकारने घेतलेल्या ज्या निर्णयाचं स्वागत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री याबाबतच त्यांनी सोशल मिडिया पोस्टद्वारे राज्य सरकारचे आभार देखील मानले आहेत.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराड, नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली असून यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.

पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मनःपूर्वक धन्यवाद !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT