Cabinet Decisions : जैन, बौध्द, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजासाठी सरकारने उघडली तिजोरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting CM Eknath Shinde Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहे.
Maharashtra Cabinet Decisions
Maharashtra Cabinet DecisionsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या दोन बैठका घेतल्या. शुक्रवारी झालेल्या बैठकीतही अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जैन, बौध्द, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजासाठी सरकारने तिजोरी उघडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. या बैठकीत जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ब्राम्हण समाजासाठीही महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे.

Maharashtra Cabinet Decisions
Ahmednagar Now Ahilyaanagar : लोकप्रिय निर्णयांचा धडाका; अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब, आता...

बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठीही आर्थिक विकास महामंडळे स्थापन केली जाणार आहेत. बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास कैद

राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास व एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील गड-किल्ल्यांवर होणारी नासधूस, मद्यसेवन तसेच अस्वच्छता करणाऱ्यांवर वचक बसू शकतो.

Maharashtra Cabinet Decisions
Harshvardhan Patil : प्रत्येक टर्ममध्ये लाल दिवा मिळवणारे इंदापूरचे पाटील आता पवारांच्या आखाड्यात

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर काही महत्वाचे निर्णय :

- राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ

- राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढ

- राज्यातील आणखी 104 आयटीआय संस्थांचे नामकरण

- महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार

- दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन

- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार

- टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व. अनिल भाऊ बाबर यांचे नाव

- पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचन

- संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार

- लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण

- कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या

- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

- राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र

- महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ

- आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार

- बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल

- कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय

- महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार

- कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव

- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; 2604 कोटीस मान्यता

- राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. 1 लाख 60 हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित

- उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन

- राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण

- शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार

- सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार

- वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार

- डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना

- वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी

- रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com