Indapur News : इंदापूर तालुक्यातील बोरीगावच्या श्री खंडोबादेवाच्या यात्रेला लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी दिग्गज राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावल्याचे दिसून आले आहे.
इंदापूर तालुक्यातील बोरीगाव महत्त्वाचे गाव आहे. बोरीगाव सातत्याने पवार कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असते. कोणत्याही निवडणुकीमध्ये बोरीकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला भरभरून मताधिक्य देत असतात. मात्र राष्ट्रवादीमधील फुटीमुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये बोरीकर कुणाच्या पारड्यामध्ये वजन टाकणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बोरीगावची यात्रा नुकतीच पार पडली असून यात्रेला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), माजी मंत्री राम शिंदे, आमदार दत्तात्रेय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि टेक्स्टाइल्स पार्कच्या बारामतीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून इंदापूर, बारामती तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यात दौरे वाढले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. भाजपने अे फॉर अमेठी व बी फॉर बारामती जाहीर करून बारामती लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची दोघांची मिळून मतदारसंघामध्ये ताकद वाढली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांचेही इंदापूर तालुक्यात जवळचे संबंध आहेत. तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये असल्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळे चित्र इंदापूर तालुक्यात दिसण्याची शक्यता असून बारामती लोकसभेची निवडणूक चुरशीची होईल, अशी अपेक्षा आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.