Supporters celebrate after NCP candidate Bharat Shah’s narrow victory in the Indapur Nagar Parishad election, marking a key political moment in Pune district politics. Sarkarnama
पुणे

Indapur Nagar Parishad Result : अजितदादांना आव्हान देणाऱ्या प्रदीप गारटकरांची दत्तामामांनी पक्की जिरवली

Indapur Nagar Parishad Election Result : माजी मंत्री, माजी आमदार असलेल्या हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले प्रवीण माने यांनी आपली ताकद गारटकर मागे उभी केली होत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्याने दत्तात्रय भरणे यांनी देखील निवडणुकीच्या प्रचारात आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं.

Sudesh Mitkar

Pune News, 21 Dec : पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर नगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक चर्चेमध्ये राहिली. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रदीप गारटकर यांनी पक्षाचा राजीनामा देत थेट इंदापूरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता.

त्यापूर्वी मंत्री आणि स्थानिक आमदार असलेल्या दत्तात्रय भरणे यांनी भरत शहा यांना पक्षांमध्ये घेत इंदापूरची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे गारटकर नाराज होते त्यांनी आपली नाराजी थेट पक्ष नेतृत्वाला कळवली होती.

मात्र पक्ष नेतृत्वाकडून निर्णयात कोणताही बदल न झाल्याने गारटकर यांनी पक्षाचा राजीनामा देत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. प्रदीप गारटकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेने त्यांना आपला पाठिंबा दर्शवला होता.

माजी मंत्री, माजी आमदार असलेल्या हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले प्रवीण माने यांनी आपली ताकद गारटकर मागे उभी केली होत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्याने दत्तात्रय भरणे यांनी देखील निवडणुकीच्या प्रचारात आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंजक बनली होती.

निकालानंतर मात्र इंदापूर नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा अवघ्या 120 मतांनी विजयी झाले असून अपक्ष उमेदवार प्रदीप गारटकर यांचा अवघ्या 120 मतानी पराभव झाला आहे. प्रदीप गारटकर यांचा झालेला हा पराभव हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रवीण माने यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT