Pune BJP : सासवडमध्ये विजय शिवतारेंना मोठा धक्का! संजय जगतापांना पक्षात घेण्याची भाजपची खेळी यशस्वी

Maharashtra Nagar Panchayat Results 2025 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. ही मुसंडी मारताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील भाजपने धोबीपछाड दिला आहे. पुणे जिल्ह्यातील पहिला निकाल समोर आला असून तो भाजपच्या झोळीमध्ये पडला आहे.
vijay Shivtare, sanjay jagtap
BJP leaders celebrate a historic victory in Saswad Nagar Panchayat, Pune district, as Maharashtra Nagar Panchayat election results 2025 show BJP emerging as the largest party statewide.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 21 Dec : महाराष्ट्रातील एकूण २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले, तर उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सदस्यपदांसाठी शनिवारी (२० डिसेंबर) मतदान झाले. आज, २१ डिसेंबर रोजी राज्यभरात सकाळी १० वाजल्यापासून सर्व ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.

आता राज्यभरातील नगरपंचायती निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. राज्यामध्ये भाजप सर्वात जास्त जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे. तर त्या पाठोपाठ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारची राष्ट्रवादी असल्याचे पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. ही मुसंडी मारताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील भाजपने धोबीपछाड दिला आहे. पुणे जिल्ह्यातील पहिला निकाल समोर आला असून तो भाजपाच्या झोळीमध्ये पडला आहे.

vijay Shivtare, sanjay jagtap
Kishori Pednekar : 'आमदार पैशांच्या पेट्या घेऊन बसलेत, आजचा निकाल हा केवळ जय-पराजयाचा नसून तो निष्ठेचा की खोक्यांचा हे ठरवणारा...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून भाजपने पुणे जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लॉटस राबवल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये भाजप आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला कुठेतरी आता यश मिळताना पाहायला मिळत आहे. भाजपने ऑपरेशन लोटस अंतर्गत काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार असलेल्या संजय जगताप यांना पक्षांमध्ये घेतलं होतं.

त्याचा कुठेतरी फायदा भाजपाला झाल्याचं पाहायला मिळत आहे. सासवड नगरपंचायतीमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे .आणि या सत्तेचे शिल्पकार ठरलेत ते संजय जगताप इतिहासात पहिल्यांदाच भाजपला सासवड नगरपालिकेमध्ये यश मिळवता आला आहे.

vijay Shivtare, sanjay jagtap
Ausa Nagar Parishad election Result : CM फडणवीसांच्या मर्जीतील आमदाराला मोठा धक्का; राष्ट्रवादीने चारली धूळ...

निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी थेट लढत झाल्याचं पाहायला मिळाले. एकीकडे काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार संजय जगताप तर दुसरीकडे विद्यमान शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे हे होते. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली होती.

त्यातच संजय जगताप यांच्या आई आनंदी जगताप या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वतः उतरल्या होत्या. तर दुसरीकडे सचिन भोंगळे यांना शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं होतं. मात्र या निवडणुकीत तब्बल १००० मतांनी आनंदी जगताप या निवडून आल्या असून भाजपाचे १३ नगरसेवक आणि शिवसेनेचे ९ नगरसेवक आतापर्यंत निवडणूक जिंकले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com