Nirmala Navale 
पुणे

Nirmala Navale: इन्स्टास्टार माजी सरपंच निर्मला नवलेंना हरवलं; भाजप उमेदवारानं उधळल्या नोटा? व्हिडिओ व्हायरल

Nirmala Navale: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत इन्स्टास्टार पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला शुभम नवले यांचा पराभव झाला. या पराभवाची विजयी उमेदवारापेक्षा जास्त चर्चा झाली.

Amit Ujagare

Nirmala Navale: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातल्या कारेगाव गणातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माजी सरपंच निर्मला शुभम नवले यांचा पराभव झाला. भाजपच्या उमेदवार मनिषा पाचंगे यांनी त्यांचा अवघ्या ३२९ मतांनी पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागल्यानंतर निर्मला नवले यांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसा, दारु आणि ड्रग्जचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यानंतर आता एका व्हायरल व्हिडिओमुळं आणखी खळबळ उडाली आहे. यामध्ये नवलेंना हरवल्याबद्दल भाजपच्या उमेदवाराकडून कारेगाव ग्रामपंचायतीसमोर मोठ्या प्रमाणावर नोटा उधळल्याचा दावा केला जात आहे.

व्हिडिओत नेमकं काय?

कारेगावमधील या व्हिडिओत गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी दिसते आहे. हे कार्यकर्ते आपला उमेदवार जिंकल्याचा जल्लोष साजरा करत आहेत. सर्वांच्या अंगावर गुलाल लागलेला दिसत असून जल्लोष सुरु असतानाच अचानक काही चलनी नोटा या ग्रामपंचायत कार्यालयाच्या दारातच उधळण्यात आल्या आहेत. त्याचवेळी हे कार्यकर्ते घोषणाबाजी करतानाही दिसत आहेत. विजयोत्सव साजरा करणारे हे कार्यकर्ते पंचायत समिती कारेगाव गणातून जिंकून आलेल्या भाजपच्या उमेदवार मनिषा पाचंगे यांचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच उमेदवाराकडून इथं पैसे अर्थात चलनी नोटा उधळण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

पैसा जिंकल्याचा नवलेंचा आरोप

दरम्यान, पंयातच समितीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रिलस्टार, इन्स्टास्टार सरपंच म्हणून ओळख निर्माण झालेल्या निर्मला नवले यांच्या खूपच जिव्हारी लागला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवशी नवले यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. त्याचबरोबर या निवडणुकीत अनेक गंभीर प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या व्हिडिओत त्यांनी म्हटलं की, माझा ३२९ मतांनी झालेला पराभव माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होता. मात्र पैशांचा खूपच अतिवापर होऊन सुद्धा ६५७७ मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. या निवडणुकीत पैसा जिंकाल, बोगस मतदान जिंकलं आणि माणूस हारला हे स्पष्ट आणि कटू वास्तव आहे.

या निवडणुकीत विरोधकांकडून दारुबरोबरच ड्रग्जचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी रात्रभर जागून काम करावं यासाठी ड्रग्जचा अतिवापर करण्यात आला. याचा दुर्दैवानं आज कोणता उमेदवार जास्तीत जास्त पैसे वाटतो हेच विजयाचे निकष ठरले आहेत म्हणूनच आजची परिस्थिती अशी झाली आहे की, ज्याला राजकारण करायचं आहे त्यानं आधी पैसा कमवावा, तो निवडणुकीत वापराला, जिंकून यावं आणि नंतर जनतेकडं पाठ फिरवावी. आज मला माझे मार्गदर्शक दिवंगत अजितदादा पवार यांचे विचार आठवतात की राजकारण हे खूप खराब आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT