Eknath shinde, Amol mitkari Sarkarnama
पुणे

बाळासाहेबांऐवजी मोदी-शहांच्या नावाने चिन्ह मागा, तुमची ताकद कळेल : मिटकरींनी डिवचले!

Amol Mitkari : विजय शिवतारेंचे वय वाढलंय, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असेही मिटकरी म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसेनेचं चिन्हं गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 'मशाल' चिन्ह देण्यात आले आहे, 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या नावाला मंजुरी मिळाली. शिंदे गटालाही 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव आयोगाकडून मिळाले आहे. याच मुद्द्यावरून आता, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. "बाळासाहेब ठाकरे ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा. तुम्हाला ताकद दिसून येईल, असे आव्हान मिटकरी यांनी दिले.

शिंदे गट बाळासाहेवांच्या नावानो चिन्हाची मागणी करत आहेत. मात्र आमचे आव्हान आहे की, शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्ह मागून घ्यावे. तर तुम्हाला तुमची ताकद कळेल, असा जोरदार टोला मिटकरी यांनी शिंदेना लगावला.

मिटकरी पुढे म्हणाले, आजपर्यंत अनेकांना चिन्ह बदलावे लागले. जनसंघ, काँग्रेस यांनाही पक्षचिन्हे बदलावे लागले. यामुळे फार काही फरक पडला नाही. जिथे ठाकरे हे नाव आहे. तिथे शिवसैनिकांचे रक्त सळसळतं. लोक मशाल चिन्हालाच पसंती दर्शवली. धगधगती मशाल हेक्रांतीचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे शिवसेनाही क्रांतीचे प्रतीक आहे. शिवसेनाला आमचा मित्रपक्ष म्हणून नेहमीच पाठिंबा असणार आहे. असे मिटकरी यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना संपवली ती राष्ट्रवादीने, असा आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला होता. यावर मिटकरी म्हणाले, ईडीच्या भीतीने भावना गवळी, अनंतराव अडसूळ, प्रतापराव जाधव हे सगळे शिंदेकडे गेले. शिवतारेंचे आता वय वाढलंय, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशी टीका मिटकरींनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT