आमदार राम सातपुते
आमदार राम सातपुते सरकारनामा
पुणे

राष्ट्रगीताचा अवमान : ममता बॅनर्जींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे पत्र भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांनी मुंबई पोलिसांकडे दिले आहे.

या प्रकरणी आमदार सातपुते यांनी मंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून या पत्रात ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी या तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर आहेत.या दरम्यान, मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी अर्धवट राष्ट्रगीत म्हणून अवमान केला आहे. या प्रकरणी कायद्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो.यासाठी त्यांनी कायद्याचा आधार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार सातपुते यांनी केली आहे.

मुख्यमंत्री बॅनर्जी यांची कृती राष्ट्रगीताचा अवमान करणारी असून त्यांच्यासारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीने अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. त्यामुळे १९७१ च्या प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर या कायद्यातील कलम तीन प्रमाणे मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यवर गुन्हा दाखल होऊ शकतो.याशिवाय राष्ट्रगीत सुरू असताना पाळावयाचे नियम सांगणाऱ्या २०१५ साली जारी करण्यात आलेल्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशाचा भंग झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे आमदार सातपुते यांनी या पत्रात म्हटले आहे.

बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत अर्धवट म्हणत जय मराठा, जय बांगला म्हणत भाषणाचा समारोप केला होता.य प्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीदेखील आक्षेप घेतला आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT