Vikas Dangat Criticized Pradip Garatkar Sarkarnama
पुणे

Vikas Dangat On Pradip Garatkar: हवेली तालुका समजून घेणं गारटकांना या जन्मात तरी शक्य नाही; दांगट-पाटलांचा हल्लाबोल !

Pune Politics| पुणे पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट आणि भाजपच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलने १८ पैकी १३ जागांवर दणदणीत विजय झाला.

सरकारनामा ब्युरो

Haveli Taluka: जिल्हा बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात लढणाऱ्या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये सहभागी झाल्याने विकास दांगट-पाटील यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या या बंडखोरीमुळे ही निवडणुक चांगलीच चर्चेची ठरली. पण 'हे पॅनल उभं करताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट स्वत: विकास दांगट यांनी केला आहे. (It is not possible for Pradeep Gartkar to understand Haveli Taluka in this life)

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर नेते पुणे पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट (Vikas Dangat) आणि भाजपच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलने १८ पैकी १३ जागांवर दणदणीत विजय झाला.तर राष्ट्रवादीच्या पॅनलचे २ उमेदवार आणि तीन जागांवर स्वतंत्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी निवडणुकीवर सविस्तर भाष्य केलं आहे.

हवेली बाजार समितीच्या निवडणुकीबाबत आता विकास दांगट यानी काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. ''जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीवेळी जी टीम होती ती बाजार समितीच्या निवडणुकीत देखील सोबत राहिली तर आमच्या पॅनलचा विजय होईल, असा आम्हाला विश्वास होता. बँकेच्या निवडणुकीवेळी काही जणांना शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्यासाठी आपण निर्णय घेतला, असंही दांगट यांनी यावेळी सांगितलं. (Haveli Bazar Samiti)

तसेच, तुम्ही पक्षाच्या विरोधात पॅनल उभं केलं आपण राष्ट्रवादी सोडणार का? असा प्रश्न दांगट यांना विचारला असता, ते म्हणाले की, काही मंडळी नेत्यांची दिशाभूल करत आहेत. पण नेते हे नेते आहेत याबाबत मी फारसं बोलणार नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, असं सांगत निवडून आलेली टीम निश्चितच विकास करेल,असा विश्वासही दांगट यांनी यावेळी व्यक्त केला.

तुम्ही भाजपकडून खडकवासला लढणार असल्याचा आरोप प्रदीप गारटकर यांनी केला आहे. असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर "हवेली बाजार समितीच्या निकालातून गारटकरांना स्वच्छ आणि स्पष्ट उत्तरं मिळालं आहे. आता त्यांनी आत्मपरीक्षण करावं. हवेली तालुका समजण्यासाठी त्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असा टोलाही दांगट यांनी गारटकरांना यावेळी लगावला.

नव्या पॅनलवेळी अजित पवारांनी समजूत काढली होती का? असं विचारलं असता त्यांनी 'मला खात्री होती,'असं सांगत उत्तर देणं टाळलं.पण याचवेळी त्यांनी दादा दादा आहेत, असं सूचक विधानही केलं.तसेच, संपूर्ण पॅनल निवडून येईल काहीही अडचण येणार नाही.पण आता दुःख एवढेच आहे की माझे सहकारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राभाऊ वांजळे हे निवडून येऊ शकले नाही. त्यामुळे 'गड आला पण सिंह गेला' पण त्यांनाही भविष्यात कुठेतरी संधी देऊ, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या निवडणुकीत किती खर्च झाला, यावर बोलताना ते म्हणाले की धनशक्तीविरोधात आमचा सामना होता आणि आम्ही जिंकलो. असं मोघम उत्तर दिलं. तसेच, आता बाजार समितीवर कोणत्या पक्षाचा सभापती होणार, यावर त्यांनी उत्तर थेट दिलं नाही. या विजयाचे श्रेय कोणत्या पक्षाला किंवा नेत्याला देणार, या प्रश्नावर त्यांनी फक्त तालुक्याला देणार, असं उत्तर देत उत्तर देण टाळलं. त्यानंतर आपण पुन्हा अजित पवार यांना भेटणार का? असं विचारल्यावर त्यांनी वेट अँड वॉच असं उत्तर देत पुन्हा एकदा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपनेही सत्ता मिळवली .पण आता बाजार समितीवर सभापती कुणाचा होणार आणि दांगट यांचे पुढची वाटचाल कशी असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT