Kolhapur Bazar Samiti Result : कोल्हापुरातील पहिला निकाल जाहीर ; हमाल गटातील बाबुराव खोत विजयी

Kolhapur Bazar Samiti Result News update : अपक्ष उमेदवार आणि माजी संचालक बाबुराव खोत विजयी झाले आहेत.
 Bazar Samiti Result
Bazar Samiti ResultSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Bazar Samiti Result News update : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे. पहिला निकाल हाती आला आहे. हमाल गटातला पहिला निकाल समोर आला आहे. यात अपक्ष उमेदवार आणि माजी संचालक बाबुराव खोत विजयी झाले आहेत.

कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदान झाले आहे. विकास संस्था गटात राधानगरी तालुक्यातील 199 विकास संस्थेच्या 2395 मतदारांपैकी 2173 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. तर ग्रामपंचायत गटात तालुक्यातील 98 ग्रामपंचायतीमधील 922 ग्रामपंचायत मतदारांपैकी 893 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

 Bazar Samiti Result
Bazar Samiti Election : बारामती बाजार समिती पुन्हा राष्ट्रवादीकडे ; अजितदादांच्या रणनीतीमुळे भाजपचा सुपडा साफ

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. त्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकाही महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. शुक्रवारी 147 बाजार समित्यांसाठी चुरशीने झालेल्या मतदानामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

 Bazar Samiti Result
Nagar Bazar Samiti Result : नगरमध्ये विखे, कर्डिलेंची जादू ; लंकेंचा डंका, तनपुरेंचे वर्चस्व अबाधित, निवडणुकीची ही आहेत वैशिष्ठ्ये..

अहमदनगर जिल्ह्यातील १४ पैकी सात बाजार समित्यांचे निकाल जाहीर झाले. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नगर तालुक्यात निर्विवाद वर्चस्व राहिले, तर राहुरीत त्यांना धक्का बसला. आमदार नीलेश लंकेंचा डंका पुन्हा वाजला असून त्यांनी सर्व जागा पटकावल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीला चार, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीला दोन बाजार समित्यांवर वर्चस्व सिद्ध करता आले. कर्जतमध्ये मात्र आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्या पारड्यात मतदारांनी समसमान जागा टाकल्या.

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी कृषी बाजार समितीत आदिनाथ शेतकरी मंडळाने १७ जागा मिळविल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ॲड. प्रताप ढाकणे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा विकास मंडळाला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. या बाजार समितीवर ॲड.ढाकणे यांची सत्ता होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com