Jagdish Mulik  Sarkarnama
पुणे

Loksabha Election 2024 : पुणे भाजपमधील धुसफूस उघड; फडणवीसांच्या भेटीसाठी मुळीकांनी गाठली मुंबई!

Jagdish Mulik and Devendra Fadnavis meet : सह्याद्री अतिथिगृहावर मुळीक आणि फडणवीसांमध्ये चर्चा

Mayur Ratnaparkhe

Pune Lok Sabha Constituency bjp News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दोन दिवसांपूर्वी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता लवकरच भाजप दुसरी यादीही जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांना स्थान नव्हतं. मात्र, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा क्रमांक लागू शकतो. या पार्श्वभूमीवर आता भाजपमधील इच्छुकांमध्येही अंतर्गत कुरघोड्या आणि राजकारण सुरू झाल्याचं दिसत आहे.

दरम्यान, पुणे भाजपमधील अंतर्गत वाद आता देवेंद्र फडणवीसांच्या(Devendra Fadnavis) दरबारी पोहाेचला आहे. माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईला गेले आहेत. सह्याद्री अतिथिगृहावर मुळीक आणि फडणवीसांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक(Jagdish Mulik), राष्ट्रीय नेते सुनील देवधर आदींची नावे शर्यतीत आहेत. या शर्यतीमध्ये मोहोळ बाजी मारू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, मोहोळ यांच्या उमेदवारीला आता भाजपमधूनच उघडपणे विरोध होताना दिसत आहे. मोहोळ आणि मुळीक यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात पुण्यात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून मोहोळांविरोधात पुणे महापालिकेच्या आवारात एकेरी उल्लेख करत बॅनरबाजी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 'स्टँडिंग दिली, महापौर दिलं, आता बास झालं... तुला नक्की पाडणार' असा इशारा मोहोळ यांना देण्यात आला आहे. शिवाय बॅनरच्या खाली 'कष्टाळू भाजप कार्यकर्ते' असं लिहिण्यात आलं आहे. हे बॅनर कोणी लावलं हे जरी उघड झालं नसलं तरी यावरून राजकीय वर्तुळात भाजपमधील अंतर्गत वादाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे भाजपत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक कार्यक्रमात ही धुसफूस दिसूनही आली आहे. पण, हा वाद कधी उघडपणेसमोर आला नव्हता. अशातच आता महापालिकेच्या आवारातच बॅनरबाजी केल्यानं भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या बॅनरची माहिती मिळताच पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी हा बॅनर हटवला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT