Shelke Reply to Pawar : पवारांच्या इशाऱ्याला शेळकेंचे उत्तर; ‘असल्या घाणेरड्या राजकारणाची वेळ माझ्यावर अजून आली नाही'

Maval NCP Sharad Pawar party Sabha : शरद पवार यांच्यावर आमची आजही श्रद्धा आहे आणि उद्या भविष्यातही राहणार आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.
Sharad Pawar-Sunil Shelke
Sharad Pawar-Sunil ShelkeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सुनील शेळके यांचं कॅरेक्टर आणि व्यक्तिमत्त्व काय आहे, हे मावळ तालुक्यातील जनतेला माहिती आहे. कोणालाही धमकावल्याचा पुरावा दिला, तर मी जाहीरपणे त्या व्यक्तीची आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माफी मागेन. राजकारणात पुढं जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण, अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण करण्याची वेळ आज तर माझ्यावर आलेली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.

शरद पवार (Sharad Pawar) यांची आज (ता. 7 मार्च) लोणावळ्यात सभा झाली. त्या सभेत बोलताना पवार यांनी सुनील शेळके (Sunil Shelke) यांना उद्देशून तू आमदार कुणामुळं झाला, असा सवाल करून नीट वाग नाही, तर मला शरद पवार म्हणतात, असा इशारा दिला आहे. त्यावर आमदार शेळके बोलत हाेते.

Sharad Pawar-Sunil Shelke
Sharad Pawar : "मला 'शरद पवार' म्हणतात, माझ्या वाटेला गेला, तर...", पवारांचा शेळकेंना थेट इशारा

ते म्हणाले, शरद पवार यांच्यावर आमची आजही श्रद्धा आहे आणि उद्या भविष्यातही राहणार आहे. पवारसाहेबांनी असं वक्तव्य का केलं, याबाबतची कुठलीही कल्पना मला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणार आहे. आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.

पवारसाहेब आणि त्यांच्यासोबत असणारे नेतेमंडळी माझ्याबाबत मावळ मतदारसंघात जे वक्तव्य करत आहेत. मी कोणाला दम दिला, सभेला जाऊ नका, असे म्हटल्याचं सांगितलं जातं आहे. मला त्यांनी एका कार्यकर्त्याचा फोन अथवा माहिती दिली तर मी त्याबाबत जाहीरपणाने माफी मागेन. पण, शरद पवार मावळ तालुक्यात येत असताना त्यांच्यासोबत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझ्या मतदारसंघात येऊन पन्नासदेखील कार्यकर्ते येत नाहीत, त्यामुळे तालुक्यातील शिवसेना, काँग्रेस आणि मित्रपक्षाचे कार्यकर्ते एकत्रित घेऊनही केवळ ३०० लोकांमध्येच त्यांना कार्यक्रम करावा लागत आहे. विकासकामांच्या जोरावर मावळमधील जनता आज अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असेही शेळके यांनी नमूद केले.

Sharad Pawar-Sunil Shelke
Shirur Loksabha News : कोल्हेंविरोधात शिरूरच्या मैदानात महायुतीकडून कोण उतरणार...?

आमदार सुनील शेळके म्हणाले, मावळ तालुक्यातील जनता सूज्ञ आहे. त्यांना योग्य वाटलेला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तालुक्यातील जनतेच्या जिवावर माझं राजकारण असेल. माझ्या तालुक्याच्या विकासात योगदान देणारे अजितदादा यांच्या पाठीशी हा तालुका खंबीरपणाने उभा आहे. पद आणि उद्याची राजकीय कारकीर्द डोळ्यांसमोर ठेवून आम्ही राजकारण करत नाही. साहेबांनी असं विधान माझ्याबाबत का केलं, याचा विचार मी पुढच्या काळात नक्कीच करेन.

Sharad Pawar-Sunil Shelke
Abhijit Gangopadhyay News : न्यायाधीशपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांतच भाजपमध्ये प्रवेश; लोकसभेचं तिकीटही मिळणार

काय म्हणाले होते शरद पवार?

बाबा रे तू आमदार कुणामुळं झाला. तुझ्या सभेसाठी इथं कोण आलं होतं. त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होतं. निवडणुकीत पक्षचिन्हासाठी नेत्याची सही लागते. ती सही माझी आहे. जे कार्यकर्ते, तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला, आज त्यांनाच तुम्ही दमदाटी करत आहात. नीट वाग नाही, तर शरद पवार म्हणतात मला. मी त्या रस्त्याने कधी जात नाही. मी त्या रस्त्याने जाण्याची स्थिती निर्माण केली तर मी कोणाला सोडत नाही, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com