Sharad Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Jalna Maratha Andolan : लोकशाहीचा 'जालियानवाला बाग ते जालना' प्रवास; राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar On Maharashtra Govt : जालन्यातील लाठीहल्ल्यामुळे 'इंग्रज रिटर्न्स' आल्याची टीका

उत्तम कुटे

उत्तम कुटे

Pune Political News : जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावातील मराठा आरक्षणाचे आंदोलन शुक्रवारी पोलिसांनी चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावरून राज्यभरातून सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या लाठीचार्जव्दारे लोकशाहीचा 'जालियानावाला बाग ते जालना' असा प्रवास सुरु झाल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली. या लाठीहल्ल्यातून 'इंग्रज रिटर्न्स' आले की काय असा भास होत असल्याचे म्हणत साहेब गटाने शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा खरपूस समाचार घेतला. (Latest Political News)

पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड पदाधिकाऱ्यांनी शनिवारी जालना घटनेवरून सरकारला धारेवर धरले. जालन्यातील लाठीमारावरून भाजपला न्याय, स्वातंत्र्य आणि समता नको आहे. त्यांना संविधान नको असल्याची कडवट टीका मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी केली. शिंदे-फडणवीस सरकारने आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला होता. त्यामुळे राज्याला हे काही नवीन नाही, अगदी इंग्रजांच्या राजवटीपासून आपण तो पाहत आलो आहोत, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

जाती-जाती आणि धर्माधर्मात भांडणे लावून इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्यांचे खरे रूप जालियनवाला बाग हत्याकांडातून समोर आले. जालन्यातही तेच झाले, असे म्हणत पाटील यांनी या घटनेची तुलना जालियानवाला बाग घटनेशी, तर सरकारची इंग्रजांशी केली.

"आम्ही सांगतो फक्त तेच करा मग, लाठ्या मारणे असो की सरकार पाडणे असो. आंदोलनाचेही स्वातंत्र्य या सरकारला द्यायचे नाही. आरक्षण सोडाच भाजपकडे ईडी आणि आयटी यासारख्या बंदुकी, लाच आणि लाठ्या आहेत. त्याचा वापर करून केंद्रातले भाजप सरकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपदे देऊन भ्रष्टाचाराची एक एक लाठी लोकशाहीच्या पृष्ठभागावर मारत आहेत", अशा तीव्र शब्दात पाटलांनी सरकारचा समाचार घेतला.

आज मणिपूर धगधगत असून तिथे स्थानिक अस्मिता सुद्धा महत्वाची आहे. पण, हेच भाजप विसरत चालले असून त्यांना राष्ट्र प्रथम महत्वाचे वाटत आहे. स्थानिक अस्मितेवर प्रेम म्हणजे भारतावर प्रेम हे सांगण्याची गरज आहे. आमचे आंदोलन आणि आमच्या मागण्या म्हणजेच भारतावर प्रेम, हे भाजपाला समजायला हवे, असा टोला पाटलांनी लगावला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT