Sharad Pawar News : वार-प्रतिवार : पिचड अन् पाटलांच्या राजीनाम्याची आठवण करून देत पवारांनी फडणवीसांना डिवचले

Devendra Fadnavis News : पवारांनीही जशास तसे उत्तर देत फडणवीसांना जबबादारीची जाणीव करून दिली.
Devendra Fadnavis, Sharad Pawar News
Devendra Fadnavis, Sharad Pawar NewsSarkarnama

Jalna Maratha Protest : जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत असताना, राजकीय वातावरणही तापले आहे. आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. यावर तुम्ही आरक्षणासाठी काय केले, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोवारी हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित करून पवारांना लक्ष्य केले होते. त्यावर शनिवारी पुन्हा पवारांनीही जशास तसे उत्तर देत फडणवीसांना जबबादारीची जाणीव करून दिली.

पवारांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील लाठीचार्जच्या घटनेत जखमी झालेल्या आंदोलक आणि नागरिकांची अंबड उपजिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. मी जखमी लोक आणि आंदोलकांना भेटलो. ते सांगत होते मुंबईहून (Mumbai) फोन आला आणि पोलिसांचा दृष्टीकोन बदलला. मात्र, कुणाचा फोन आला, याची माझ्याकडे माहिती नाही. पण तिथे काही लोक गृहमंत्र्यांच्या नावाने घोषणा देत होते."

Devendra Fadnavis, Sharad Pawar News
Jalna Maratha Protest : शरद पवारांचा आंदोलकांना सबुरीचा सल्ला; तर फडणवीसांवर निशाणा; म्हणाले...

"माझ्याकडे अधिकृत माहिती नाही पण, 'इंडिया' आघाडीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे झाल्याची चर्चा आहे. मी मुख्यमंत्री असताना २८ वर्षांपूर्वीची गोष्ट ते सांगतात. त्यावेळी नागपूरला गोवरींचे आंदोलन झाले. चेंगराचेंगरी झाली होती. त्या घटनेचा उल्लेख करून फडणवीसांनी त्यावेळी मी राजीनामा का नाही दिला, असा सवाल केला. त्यांना सांगतो, मी त्यावेळी नागपुरात नव्हतो. माझ्या मंत्रिमंडळातील तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता." असे सांगत पवारांनी फडणवीसांणा टोला लगावला.

"पिचड यांच्याप्रमाणेच आता गृहमंत्र्यांनी स्वतः हून राजीनामा द्यावा. ज्याची जबाबदारी असते त्याने जबाबदारी घ्यायची असते. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना मुंबई जे झाले त्याची प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनीही राजीनामा दिला होता", असे पवारांनी सांगितले.

"मोबाईल चित्रीकरणात स्पष्ट दिसतेय लोक बसलेले असताना पोलीस दलाचे प्रतिनिधी येतात आणि काही वेळाने लाठी हल्ला करतात, पोलिसांवर हल्ला झाला असे दिसत नाही. पोलिसांनी हल्ला केला असे दिसते.", असा आरोपही शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. "मी पोलिसांना दोष देत नाही, मात्र याची न्यायालयीन चौकशी व्हावी", अशी मागणी त्यांनी केली. "इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल. सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यासाठी पूर्ण सहकार्य राहील", असे आश्वासनही पवारांनी दिले.

Devendra Fadnavis, Sharad Pawar News
Jalna Maratha Protest : शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; "एकीकडे चर्चा, तर दुसरीकडे लाठीमार.."

फडणवीस काय म्हणाले होते ?

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) गोवारी हत्याकांडाचीही पवारांना आठवण करून दिली होती. "पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड झाले होते. त्यावेळी ११३ लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळी पवार ते पाहायलाही गेले नाही आणि राजीनामाही दिला नाही. आता या परिस्थितीत त्यांचे काही लोक आमच्यासोबत सत्तेत आले आहेत. त्यामुळे ते नाराज आहेत, चिडलेले आहेत, व्यथित आहेत. यातूनच ते असे आरोप करतात. ते मोठे नेते आहेत. मी त्यांना उत्तर देणार नाही."

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com