Maratha Protest Lathi Charge : मराठा समाजातील तरुणांचा बुध्‍दीभेद करण्‍याचा प्रयत्‍न; राधाकृष्ण विखेंचा पलटवार

Radhakrishna Vikhe Patil On NCP, Congress : आरक्षण दिल्‍याशिवाय आम्‍ही स्‍वस्‍थ बसणार नाही
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका आहे. यामध्‍ये सरकार कुठेही कमी पडणार नाही. यापुर्वी देवेंद्र फडणवीस मुख्‍यमंत्री असताना समाजाला मिळालेले आरक्षण पुन्‍हा प्रस्‍थापित होणे हाच सरकारचा प्रयत्‍न आहे. आरक्षण दिल्‍याशिवाय आम्‍ही स्‍वस्‍थ बसणार नाही. परंतू आता समाजातील तरुणांचा बुध्‍दीभेद करण्‍याचा प्रयत्‍न सुरु झाला आहे. याला समाजाने बळी पडू नये, असे आवाहन करत महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटलांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. (Latest Political News)

जालना येथील घडलेल्‍या घटनेवर विखे पाटील (Radhakrishna VIkhe Patil) म्‍हणाले, "या घटनेचे समर्थन मुळीच नाही. या घटनेबाबत सरकारने चौकशीचे सर्व आदेश दिलेले आहेत. दोषींवर निश्चित कारवाई होईल. केवळ आता आरक्षणाच्‍या प्रश्‍नावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न जाणीवपूर्वक केला जात आहे, हे अत्‍यंत दुर्दैवी आहे."

Radhakrishna Vikhe Patil
Jalna Maratha Protest : जालन्यात शेकडो आंदोलक आणि पोलिसांत पुन्हा धुमश्चक्री; नेमकं काय झालं ?

"राज्‍यात मुख्‍यमंत्री पदावर असताना फडणवीसांच्या प्रयत्‍नांमुळेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्‍च न्‍यायालयाने मान्‍य केले होते. मात्र मागील अडीच वर्षे राज्‍यात आघाडी सरकार सत्‍तेवर होते. आरक्षणाच्‍या मुद्यावर या सरकारने गंभीरतेने कोणत्‍याही उपाय योजन केल्‍या नाहीत. परिणामी मराठा समाजाच्‍या हक्‍काचे आरक्षण गमवावे लागले, हे सुध्‍दा दुर्लक्षित करुन चालणार नाही," असा आरोपही विखे पाटलांनी केला.

Radhakrishna Vikhe Patil
Sharad Pawar on Jalna Laticharge : पोलिसांना फडणवीसांचा फोन होता का? पवार म्हणतात ‘मी ज्योतिषी नाही...’

मागच्‍या सरकारमुळे गेलेले आरक्षण पुन्‍हा प्रस्‍थापित करण्‍यासाठी राज्‍य सरकारने सर्वतोपरी प्रयत्‍न सुरु केले आहेत. समाजाला आरक्षण दिल्‍याशिवाय आम्‍ही स्‍वस्‍थ बसणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. आरक्षण मिळविण्‍यासाठी सरकारची भावना अतिशय गंभीर आणि प्रामाणिक आहे. त्‍यामुळे समाज बांधवांनी शातंता राखावी. विरोधकांकडून होत असलेल्‍या बुध्‍दीभेदाला बळी पडू नये, असेही आवाहन करून विखे पाटलांनी विरोधकांनी लक्ष्य केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com