Prashant Jagtap, Jayant Patil News Sarkarnama
पुणे

Pune News : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशांत जगतापांचे नाव फायनल? जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Pune Lok Sabha By-Election : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागल्यास उमेदवारी कुणाला मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.

जगताप यांच्या बॅनरनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे लोकसभेसाठी तयारी करत कसल्याची चर्चा आहे. त्यातच आता जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने दावेदारी केल्याने उमेदवारी वरुन महाविकास आघाडीमध्येच संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील म्हणाले, प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते नेते आहेत. पुणे शहरात संघटनेला बरोबर घेऊन ते काम करतात. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी, अशी आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसे अनेक जणांनी मला तसे मेसेज करुन सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत आम्ही तशी चर्चा करु, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

त्यातच राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीसाठी सर्व्हेही सुरु केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा दावा अधिक प्रबळ झाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, काँग्रेस (Congress) ही जागा सोडणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने तीन नावांवर सर्व्हे केला जात आहे. त्यामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नावांची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मात्र, आता प्रदेशाध्यक्षांनीच जगताप यांचे नाव घेतले आहे, त्यामुळे त्यांचे पाडरे जड असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT