CJI Dhananjaya Chandrachud : माझ्या समोर तुमचे ट्रिक चालणार नाही; सरन्यायाधीशांनी वकिलाला फटकारले : न्यायालयात काय घडले?

Supreme Court : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची गणना शिस्तप्रिय न्यायाधीशांमध्ये केली जाते.
 Dhananjaya Chandrachud
Dhananjaya ChandrachudSarkarnama

CJI Dhananjaya Chandrachud News : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांची गणना शिस्तप्रिय न्यायाधीशांमध्ये केली जाते. गेल्या एका सुनावणीदरम्यान त्यांना न्यायालयात येण्यास थोडासा उशीर झाल्यामुळे त्यांनी माफी मागितली होती. त्यानंतर त्यांनी आज एका वकिलाला न्यायालयात समज दिली. माझ्या समोर तुमचे ट्रिक चालणार नाही, असे सीजीआय चंद्रचूड यांनी एका वकिलाला सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मंगळवारी सकाळी खटल्यांचा उल्लेख करताना, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका वकिलाला फटकारले. न्यायालयात लवकरची तारीख मिळविण्यासाठी, वकिलाने दुसर्‍या खंडपीठासमोर प्रकरणाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. तर प्रकरण आधीच सरन्यायाधीशांनी 17 एप्रिलसाठी सूचीबद्ध केले होते.

 Dhananjaya Chandrachud
Uddhav Thackeray News : 'पंतप्रधान मोदींचा बांग्लादेशच्या लढाईत सहभाग, पण बाबरीच्या वेळी हिमालयात..'; ठाकरेंचा सणसणीत टोला

जे प्रकरण स्वत: सरन्यायाधीशांनी 17 एप्रिला सूचीबद्ध केले होते. त्याच प्रकरणासंदर्भात वकिलाने सरन्यायाधीशांना पुन्हा विचारले की या प्रकरणाचा दुसऱ्या खंडपीठासमोर उल्लेख करू शकतो का? त्यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड संतापले.

सरन्यायाधीश म्हणाले, माझ्याशी अशा युक्त्या खेळू नका. आधीच्या तारखेसाठी तुम्ही त्या प्रकरणाचा इथे आणि नंतर इतरत्र उल्लेख करू शकत नाही. माझ्या अधिकारात हस्तक्षेप करु नका, अशा शब्दात चंद्रचूड वकिलाला फटकारले. जर ते प्रकरण 17 व्या क्रमांकासाठी सूचीबद्ध केले असेल तर ते 17 तारखेलाच येईल, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

 Dhananjaya Chandrachud
Karnataka BJP News : भाजपत मोठी घडामोड : उमेदवार निवडीवर येडियुराप्पा नाराज?; दिल्लीहून तातडीने बंगळूरला परतले

सीजीआय चंद्रचूड यांनी सुनावताच वकिलाने माफी मागितली. त्यानंतर सीजीआय चंद्रचूड म्हणाले, होय तुम्हाला माफ आहे. मात्र, माझ्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करु नका, असे पुन्हा सीजीआय म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com