Junnar Nagar Parishad Sarkarnama
पुणे

Junnar Nagar Parishad : बहुमत नसूनही राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी गेम फिरवला; ठाकरेंचा एकमेव नगरसेवक उपनगराध्यक्षपदी: शिंदेंच्या आमदाराला होमग्राऊंडवरच मोठा धक्का

Junnar municipalDeputy President election : जुन्नर नगरपरिषदेत शिवसेनेच्यया सुजाता काजळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. तर नगरसेवक म्हणून शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, भाजपचे 2, अपक्ष 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 1 आणि काँग्रेसचे 1 असे 20 जण निवडूण आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मीननाथ पानसरे

Junnar News, 14 Jan : अखेरच्या क्षणी घडलेल्या आणि रात्री उशीरापर्यंत चाललेल्या प्रचंड नाट्यमय घडामोडीनंतर जुन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुपाली आकाश परदेशी यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी ऐनवेळी डाव टाकून बहुमत असलेल्या सत्ताधारी शिवसेनेला आस्मान दाखवलं.

आता अल्पमत असूनही राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्तेच्या वर्तुळात एन्ट्री झाली आहे. शिवसेनेचे सहयोगी आमदार शरद सोनवणे यांना होमग्राऊंडवरच हा मोठा धक्का मानला जात आहे. जुन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मंगळवारी (ता. 13) पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा सुजाता काजळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती.

सभा सुरू झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेना व शिवजन्मभूमी विकास मंचच्या वतीने अलका शिवाजी फुलपगार तर जुन्नर शहर विकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रूपाली आकाश परदेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी अलका फुलपगार यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली.

या हरकतीवर पीठासन अधिकारी काजळे यांनी अलका फुलपगार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला. आपल्याच उमेदवाराचा अर्ज अर्ज पीठासन काजळे यांनी अवैध ठरविल्याने सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. शिवसेना शिवजन्मभूमी विकास मंचच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत या निर्णयावर आक्षेप नोंदविला. यावेळी पीठासन अधिकारी यांनी नियमानुसारच निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत पीठासन अधिकारी, नगरसेवक व प्रशासकीय यंत्रणा यांच्यामध्ये खलबते सुरू होती. जुन्नर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांकडून सभेचे प्रोसिडिंग मागवण्यात आले. यावेळी प्रोसिडिंगमधील पाने जाणीवपूर्वक फाडल्याचा आरोप शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांकडून करण्यात आला. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रात्री उशिरापर्यंत या विषयावर चर्चा सभागृहात सुरू असताना नगरपरिषदेच्या आवारात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. जुन्नर नगरपरिषदेत शिवसेनेच्यया सुजाता काजळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. तर नगरसेवक म्हणून शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, भाजपचे 2, अपक्ष 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 1 आणि काँग्रेसचे 1 असे 20 जण निवडूण आले आहेत.

निवडणुकीनंतर शिवसेना 8 + काँग्रेस 1 + अपक्ष 1 अशा 10 जणांनी गट स्थापन केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस 6 + शिवसेना उबाठा 1 + अपक्ष 1 अशा 8 जणांनी वेगळा गट स्थापन केला. भाजप 2 नगरसेवक तटस्थ राहिले आहेत. शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीला उपनगराध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT