Elected members in Junnar Panchayat Samiti after results, where BJP’s single member emerges as kingmaker in the contest between Shiv Sena and NCP alliance for the chairperson post. Sarkarnama
पुणे

Junnar Panchayat Samiti : भाजपच्या एका सदस्याच्या हाती सत्तेची चावी : सभापतीपदासाठी शिवसेना अन् राष्ट्रवादी फिल्डिंग; एकाची करावी लागणार निवड

Junnar BJP Kingmaker: जुन्नर पंचायत समितीत स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपच्या एकमेव सदस्याच्या पाठिंब्यावर सभापतीपद ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये सत्तेसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Junnar Sabhapati Nivadnuk 2026: जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 8 गटात व पंचायत समितीच्या 16 गणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली. गटातील 8 पैकी शिवसेनेचे 3 तर आघाडीचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. तर गणात 16 पैकी शिवसेनेचे 8 आणि आघाडीचे 7 व भाजपचा 1 उमेदवार विजयी झाला आहे.

गणात शिवसेनेचे सर्वाधिक 8 उमेदवार विजयी झाले मात्र स्पष्ट बहुमत मिळाले नाही. यामुळे भाजपचा उमेदवार कोणाला पाठिंबा देतो, त्यावर जुन्नर पंचायत समितीचे सभापतिपद अवलंबून राहणार आहे. सभापतिपद अनुसूचित जमाती महिला राखीव असल्याने तालुक्यात प्रथमच आदिवासी महिलेला सभापतिपदाची संधी मिळणार आहे.

निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख दिलीप बामणे यांच्या नेतृत्वात आघाडी करण्यात आली होती. अपक्ष आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली. भाजप आणि मनसे या पक्षांनीही स्वबळावर उमेदवार उभे केले होते.

शिवसेनेने 8 गट व 16 गणात, राष्ट्रवादी काँग्रेसने 7 गट व 14 गणात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 1 गट व 2 गणात, भाजपने 3 गट व 5 गणात तर मनसेने 2 गट व 1 गणात, काँग्रेस पक्षाने 2 गणात, बसपाने 1 गणात उमेदवार उभे केले होते. निवडणुकीत काँग्रेस, मनसे यांना खाते उघडता आले नाही.

आशा बुचके यांना पराभवाचा धक्का

मागील सलग 4 निवडणुकांमध्ये भाजप नेत्या आशा बुचके या निवडून आल्या होत्या. सावरगाव गटात झालेल्या चुरशीच्या तिरंगी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गुलाबराव पारखे हे विजयी झाले. आशा बुचके यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा दारुण पराभव झाला होता.

पक्षीय बलाबल - जिल्हा परिषद

2017

राष्ट्रवादी काँग्रेस : 4, शिवसेना : 3

2026

राष्ट्रवादी काँग्रेस : 04, शिवसेना : 03, शिवसेना ठाकरे : 01

पक्षीय बलाबल - पंचायत समिती

2017

राष्ट्रवादी काँग्रेस 07, शिवसेना 06, काँग्रेस 01

2026

राष्ट्रवादी काँग्रेस 06, शिवसेना 08, भाजप 01, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 01

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT