Karuna Munde Sarkarnama
पुणे

Karuna Munde: "कोणाचाही बालेकिल्ला कायम राहत नसतो, माझ्या सासऱ्यांच्या इच्छेनुसार..."; बारामतीतून लढण्याबाबत करुणा मुंडे स्पष्टच बोलल्या

Baramati Bypoll: करुणा मुंडे या बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवत आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात त्या उमेदवार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Karuna Munde: करुणा मुंडे यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भारला असून काल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती त्या अर्ज मागे घेतील असं वाटत असताना त्यांनी तो कायम ठेवल्यानं आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर त्या उमेदवार असतील. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळं ही जागा रिक्त झाली होती. पण आपण अर्ज मागे का घेतला नाही याचं कारण सांगताना त्यामागे आपल्या सासऱ्यांचा विचार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

साम टीव्हीशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, "बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता चुरस पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांच्याविरोधात आता 'स्वराज्य शक्ती सेने'च्या संस्थापक अध्यक्षा करुणा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. अजितदादांना न्याय मिळावा असा प्रयत्न कोणीही करत नाहीत, रोहित पवार यांच्याकडून हा लढा सुरू आहे मी निवडून आल्यानंतर विधानसभेत याविषयी आवाज उचलून अजितदादांना न्याय मिळवून देईल"

बारामती जरी पवारांचा बालेकिल्ला असला तरी त्या ठिकाणी येऊन निवडणूक लढवीन अशी माझ्या सासर्‍यांनी घोषणा केली होती. मात्र, मी आज त्यांची ही इच्छा प्रत्यक्षात पूर्ण करत आहे. बालेकिल्ला हा कुणाचा कायम नसतो नवीन माणसांना देखील संधी मिळणे गरजेचे आहे. मी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले होते, मात्र हर्षवर्धन सकपाळ यांना धनंजय मुंडे यांनी फोन करून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यास सांगितल्याचं कळाल्यानंतर मी माझा उमेदवारी कायम ठेवला असंही करुणा मुंडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, बारामतीत पोटनिवडणूक होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. या जागी दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रमुख उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं अॅड. आकाश मोरे यांनी अर्ज भरला होता. त्याचबरोबर इतर ५९ इच्छुकांनी देखील बारामतीतून अर्ज दाखल केला होता. यांपैकी काँग्रेससह ६ जणांनी शेवटच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले. राज्यातील भाजपप्रणित महायुती सरकार अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर दाखल करणार नसेल तर काँग्रेसचा उमेदवार अर्ज मागे घेणार नाही. पण खुद्द सुनेत्रा पवारांनीच अर्ज मागे घेण्याची विनंती केल्यानं काँग्रेसनं माघार घेतली असल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT