Ganesh Bidkar  sarkarnama
पुणे

Kasaba Bypoll : 'अब खेल शुरू होगा...'; गणेश बीडकरांना नेमकं काय म्हणायचयं ?

Kasaba Bypoll BJP News : गणेश बीडकर, धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने ही प्रमुख नावे सध्या चर्चेत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Kasaba Bypoll BJP News : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. सुरवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. सर्वच पक्षातील इच्छुकांची संख्या वाढत आहे.

Kasaba Bypoll BJP News

कसबा पोटनिवडणुकीला आता वेगवेगळे वळण लागत आहे. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांसह भाजपमधील अनेक जण इच्छुक आहेत. प्रत्येक जण उमेदवारीवर दावा करीत आहेत. महापालिकेचे माजी सभागृहनेते गणेश बीडकर, धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने ही प्रमुख नावे सध्या चर्चेत आहेत.

कसब्याच्या उमेदवारीचा पेच सुटला नसतांना भाजपने केंद्रीय निवड समितीकडे ५ नावांचा शिफारस प्रस्ताव पाठवला आहे. यात मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक याचे नाव पाठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर धीरज घाटे, हेमंत रासने आणि गणेश बीडकर यांच्या नावाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. लवकरच यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

यात गणेश बीडकरांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे राजकारण तापलं आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी व्हाटस्अँपवर स्टेटस् ठेवलं होते. त्यावरुन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारी असल्याचे दिसते. या सूचक फोटोमुळे बीडकरांनी विरोधकांसह घाटे, रासनेंना संभ्रमात टाकले आहे.

'अब खेल शुरू होगा...' असे सांगत गणेश बीडकरांनी उमेदवारीचा दावा केला. भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे शहर भाजप आणि महापालिकेच्या राजकारणातील 'चतूर खेळाडू' मानले जाणारे बिडकर हे या निवडणुकीत नेमका काय डाव टाकणार आणि पोटनिवडणुकीचे मैदान मारणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'इरादे मेरे हमेशा साफ होते है इसलिए...कई लोग मेरे खिलाफ होते है..' अशा शब्दात बीडकरांनी सोशल मीडियावरून कसब्याचे राजकारण तापवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT