Kasba Peth Bypoll Election Result  2023 News :
Kasba Peth Bypoll Election Result 2023 News :  Sarkarnama
पुणे

Kasba Peth Bypoll Election Result : धंगेकरांनी ज्योतिषाचे भाकीत खोटं ठरवलं..

सरकारनामा ब्युरो

Kasba Peth Bypoll Election Result 2023 News : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी. त्यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. या निकालापूर्वी स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. तर ज्योतिषांनीही या निकालाबाबत भाकीत केलं होते.

स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन्ही एक्झिट पोलनुसार कसब्यात भाजपला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती ती खरी ठरली. आता चिंचवड मध्ये भाजप गड राखणार का, हे लवकरच समजेल.

या दोन्ही संस्थांनी चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी होणार असल्याचे सांगितले आहे. पुण्यातील ज्योतीषी सिद्धेश्वर मारटकर यांनी कसबा आणि चिंचवडच्या निकालावर काल (बुधवारी) भाकीत केले होते. उमेदवारांच्या कुंडलीच्या आधारे मारटकर यांनी या निकालावर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते.

" दोन मार्च रोजी पुनर्वसु हे गुरूचे नक्षत्र असून वार गुरुवार आहे.गुरू या ग्रहाचा भारतीय जनता पक्षावर अंमल असल्याने या दिवशी लागणारा निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागण्याची शक्यता अधिक वाटते," असे मारटकरांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले होते.

"उमेदवारांच्या मिळालेल्या जन्म तारखेच्या आधारे तसेच प्रश्न विचारलेल्या वेळेच्या प्रश्न कुंडलीच्या आधारे हेमंत रासने यांना ग्रहांची अनुकूलता असल्याने ज्योतिष शास्त्रानुसार त्यांना विजयाची संधी मिळू शकते असे वाटते. हेमंत रासने यांच्या जन्म रविवरून होणारे गुरूचे भ्रमण त्यांच्यासाठी लाभदायक होऊ शकते," असे मारटकर यांनी सांगितले होते.

"ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने 2 मार्च रोजी पुनर्वसु हे गुरूचे नक्षत्र असून वार गुरुवार आहे.गुरू या ग्रहाचा भारतीय जनता पक्षावर अंमल असल्याने या दिवशी लागणारा निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागण्याची शक्यता अधिक वाटते," असे मारटकर म्हणाले. " चिंचवडची जागा सुद्धा भाजपला मिळू शकते असा अंदाज व्यक्त करीत आहे.यासाठी प्रश्न कुंडली चा सुद्धा आधार घेण्याचा प्रयत्न केला आहे," असे मारटकरांनी सांगितले होते.

"काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांच्या जन्म रविवरून होणारे शनीचे भ्रमण निसटता पराभव दर्शवितो. अर्थात मिळालेल्या जन्म तारखाविषयी खात्री नसल्यामुळे भाकीत चुकू शकते हे नम्रपणे सांगावेसे वाटते," असे मारटकर यांनी नमूद केले आहे. पण धंगेकरांनी मोठ्या फरकाने हा विजय मिळवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT