Chandrakant Patil, Ravindra Dhangekar
Chandrakant Patil, Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar On Patil : ''चंद्रकांतदादा आलेला पाहुणा?किती दिवस ठेवायचं हे पुणेकर पाहतील..''; धंगेकरांनी पुन्हा डिवचलं

सरकारनामा ब्यूरो

Pune News : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना डिवचण्यासाठी हू इज धंगेकर असा प्रश्न भरसभेत केला होता. यानंतर धंगेकरांनी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत कसब्याचं मैदान मारलं होतं.या विजयानंतर पाटलांच्या हू इज धंगेकर या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले होते.पण आता पुन्हा एकदा धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

कसब्यातील विजयानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) हे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय़ ठरले आहे. पण आता धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. धंगेकर म्हणाले, चंद्रकांत पाटील कोल्हापूरहून पुण्यात आलेला पाहुणा आहे. खरं तर आलेल्या पाहुण्यानं किती दिवस थांबावं याचा विचार केला पाहिजे. पण आलेल्या या पाहुण्याला किती दिवस ठेवायचं हे पुणेकर पाहतील अशी बोचरी टीकाही पाटलांवर धंगेकरांनी केली आहे.

येत्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील कोल्हापूरला जातील की थांबतील हे लवकरच कळेल. त्यांच्या बोलण्याचा रुबाब पुणेकर आगामी काळात नक्की उतरवतील असंही धंगेकर म्हणाले.

नव्या गाण्यामुळे वाद पेटण्याची शक्यता...

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर आधारित नवीन गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या गाण्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे धंगेकरांवर तयार करण्यात आलेल्या गाण्यात अगं चंपाबाई, धंगेकरला जीव थोडा लाव…मतानं कसा उधलून टाकलाय डाव अशा ओळी आहेत. हू इज धंगेकर असा प्रश्न विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं प्रत्यक्ष नाव न घेता तयार करण्यात आलेल्या हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

...तर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत आघाडीचाच विजय

भाजप खासदार गिरीश बापट यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. त्यांच्या निधनांवर रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमधील काही उमेदवारांची नावेही चर्चेत आहे.याचवेळी काँग्रेसचे आमदार धंगेकरांनी या निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे.

धंगेकर म्हणाले, भाजप सर्व्हे करत निवडणूक जिंकत असले तरी ते सर्वच ठिकाणी जिंकू शकत नाही. पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लागली तर महाविकास आघाडीच विजयी होईल असा दावा आमदार धंगेकर यांनी केला आहे. लोकसभेची जागा कोणी लढवावं याबाबतचा निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बिडकरांना पाहून धंगेकरांचा संताप...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे शहरातील विविध विकासकामांसंदर्भात ही बैठक घेण्यात आली होती.मात्र, या बैठकीला गणेश बिडकर यांना बोलवण्यात आल्याचं पाहून आमदार रवींद्र धंगेकर हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळाले होतं.

यावर धंगेकर म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरातील प्रश्नांसंदर्भात बैठकीसाठी शहरातील आमदारांना निमंत्रित केले होते. या बैठकीला चार आमदार उपस्थित होते. पण, निमंत्रित नसलेले भाजपचे कार्यकर्तेच या बैठकीत चर्चा करत होते. त्यामुळे ही बैठक प्रशासनाची होती की भाजपची, असा प्रश्न पडल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT