Kedar Jadhav Joins BJP Sarkarnama
पुणे

Kedar Jadhav: पुण्यातील मराठमोळ्या माजी क्रिकेटरची राजकीय मैदानावर एन्ट्री; BJP मध्ये करणार प्रवेश

Kedar Jadhav Joins BJP: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

Mangesh Mahale

Pune, 08 April 2025 :भारतीय अनेक खेळाडूंनी खेळाला अलविदा केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. यात काहींना यश मिळाला, तर काहींच्या पदरात अपयश पडले. आता आणखी एक माजी क्रिकेटपटूनं खेळाच्या मैदानावरुन राजकीय मैदानावर एन्ट्री केली आहे. काही दिवसापूवी त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) याची आता राजकीय इनिंग सुरू होत आहे. तो आज भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

काही दिवसापूर्वी केदार जाधवने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष,मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार,रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. तेव्हाही त्याच्या पक्ष प्रवेशाची चर्चा रंगली होती.

केदार जाधव हा मूळचा पुण्याचा असून तो आता क्रिकेटच्या मैदानातून राजकीय आखाड्यात उतरत आहे. मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्याचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द

  • केदार जाधवने 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले.

  • आयपीएलमध्ये केदार जाधव यानं 95 सामने खेळले आहेत.

  • त्यात 81 डावात त्याने 1208 धावा केल्या आहेत.

  • त्याची सर्वोच्च धावसंख्या 69इतकी राहिली आहे.

  • केदार जाधव याने आयपीएलमध्ये चार अर्धशतके ठोकली आहेत.

  • केदार जाधव याने भारतासाठी 73 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

  • त्यामध्ये 42.09 च्या प्रभावी सरासरीने 1389 धावा केल्या आहेत.

  • टी-20 सामन्यांमध्ये त्याची कारकीर्द काही खास नव्हती.

  • केदार जाधवने केवळ 9 टी-20 सामने खेळले आहेत.

  • यात त्याने 20.33 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत.

  • कसोटीमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

क्रिकेटपटूं मोहम्मद अझरुद्दीन आणि गौतम गंभीर हे खासदार राहिले होते. आता केदार जाधव राजकारणात आपलं नशिब अजमावण्यासाठी सज्ज झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT