Babaji Kale vs Dilip Mohite Sarkarnama
पुणे

Khed Taluka Politics : खेड तालुक्यात आजी-माजी आमदारांमधील राजकीय संघर्ष अन् प्रांताधिकाऱ्यांची मात्र अडचण!

MLA Babaji Kale vs Ex-MLA Dilip Mohite : महसूल विभागाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी आमदार काळेंनी बोलावली विशेष बैठक, तर माजी आमदार मोहितेंनी लगावला टोला

हरिदास कड

Political Conflict in Khed : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यपद्धतीचा  सविस्तर आढावा  घेण्याकरिता  विशेष आढावा बैठक घेण्याबाबत  आमदार बाबाजी काळे यांनी पत्र उपविभागीय अधिकारी यांना दिलेले आहे. तसेच आढावा बैठकीचे आयोजन करण्याबाबत व आढावा बैठकीला महसूल विभागाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. असे पत्रात म्हटले आहे.

यावरून माजी आमदार दिलीप मोहिते यांनी निशाणा साधला आहे. " हे बेकायदेशीर आहे. आमदारांना आढावा बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना, पत्र देता येत नाहीत व तशा बैठका घेता येत नाहीत. मी कधी अशा बैठका घेतलेल्या नाहीत." असं मोहिते यांनी म्हटलं आहे.

 त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणं बदलेलेल्या खेड तालुक्यात आता आमदार बाबाजी काळे व माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यात राजकीय द्वंद सुरू झाल्याचे दिसून येत आहे.  विधानसभा निवडणुकीत खेड तालुक्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे  बाबाजी काळे हे आमदार झाले आहे. त्यांन गेली पंधरा वर्षे आमदार राहिलेल्या माजी आमदार दिलीप मोहिते यांचा पराभव केला आहे.

आमदार बाबाजी काळे यांनी महसूल  विभागाचा सविस्तर आढावा घेण्याबाबत विशेष आढावा बैठक घेण्याबाबत पत्र खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांना दिलेले आहे त्यामुळे बैठक होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर अशा बैठकीला माजी आमदार दिलीप मोहिते यांनी विरोध केल्याने व ही बैठक घेता येत नाही असे रोखठोक सांगितल्याने खेडचे प्रांताधिकारी नेमकी काय भूमिका घेतात हेही महत्त्वाचे आहे. खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

खेड तालुक्यात महायुती व महाविकास आघाडीचे राजकीय नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यात संघर्ष सुरू आहे. चाकण येथील औद्योगिक वसाहतीत कंपन्यात अगदी ठेके मिळविण्यापासून तो संघर्ष सुरू असतो. त्याच्याही चर्चा घडत असतात. औद्योगिक वसाहतीत ज्याची सत्ता तो मलिदा खातो असे म्हटले जाते. औद्योगिक वसाहतीत विविध राजकीय नेते, पदाधिकारी  गाव पुढारी, कार्यकर्ते कंपन्यातील ठेके मिळविण्यासाठी प्रयत्न करतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT