Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar News: कोरेगाव-भीमा दंगल प्रकरण पुन्हा तापलं! आंबेडकरांच्या आरोपाने नवा ट्विस्ट; ‘फडणवीस सरकारचा कट’...

Koregaon Bhima Case Prakash Ambedkar Alleges ‘Fadnavis Govt Conspiracy’: आंबेडकर यांच्या वतीने दाखल अर्जात म्हटले आहे की, २०२० मध्ये शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोरेगाव-भीमा दंगल ही सरकारचा कट असल्याचा आरोप केला होता.

Sudesh Mitkar

Pune News: कोरेगाव-भीमा दंगलीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. ‘दंगल ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कट होता,’ असा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्याचा दावा करत, वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर मोठी मागणी केली आहे.

या प्रकरणात सरकार पुरावे सादर करून सहकार्य करत नसल्याने त्यांच्या विरुद्ध ‘अॅडव्हर्स इन्फरन्स’ म्हणजे विपरीत निष्कर्ष काढण्याची मागणी करत अॅड. किरण कदम यांनी आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. या अर्जामुळे दंगल प्रकरणातील राजकीय जबाबदारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पत्रावरून सुरू झाला वाद

प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने दाखल अर्जात म्हटले आहे की, २०२० मध्ये शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोरेगाव-भीमा दंगल ही सरकारचा कट असल्याचा आरोप केला होता. त्या पत्रात तत्कालीन फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केला, दंगलीतील सूत्रधारांना पाठीशी घातले आणि पोलिसांनी पुरावे मोडतोड करून सादर केल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याच पत्रासह संबंधित कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. मात्र, पवार यांच्या वकिलांनी हे पत्र उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे आयोगाने उद्धव ठाकरे यांनाही नोटीस बजावली होती.

ठाकरे यांचे प्रतिज्ञापत्र

यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आलेली सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री कार्यालयात जमा करण्याची पारदर्शक प्रक्रिया होती. संबंधित पत्र मुख्यमंत्री कार्यालयात असण्याची शक्यता आहे.”

फडणवीस सरकारवर बोट

दरम्यान, अर्जात असा आरोपही करण्यात आला आहे की, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाकडे संबंधित कागदपत्रे उपलब्ध असूनही ती आयोगासमोर जाणीवपूर्वक सादर करण्यात आलेली नाहीत.असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जर आवश्यक कागदपत्रे संबंधितांकडून सादर होत नसतील, तर आयोगाने त्यांच्या विरोधात ‘विपरीत निष्कर्ष’ काढावा, अशी मागणी आंबेडकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT