Maval APMC Case: न्यायालयाने हात झटकले! आता मंत्रालयाच्या 'कोर्टात' सामना! मावळ बाजार समितीचा वाद पेटला

Maval APMC Dissolution Case News update: मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरणाला नवं वळण; 28 एप्रिलला मंत्रालयात सुनावणी होणार, राजकीय वातावरण तापले.
Maval APMC Dissolution Case News
Maval APMC Dissolution Case NewsSarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे : मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वादात आता थेट “राजकीय रंगमंच” सजला आहे! न्यायालयाने या प्रकरणातून बाजूला होत चेंडू थेट मंत्रालयाच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे आता निर्णयाची सूत्रे पूर्णपणे सरकारच्या हाती गेली असून 28 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता या वादाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

संघर्ष का भडकला?

मावळच्या बाजार समितीत चित्र स्पष्ट होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 संचालक, तर भाजपचे केवळ 5. पण तरीही भाजपचे सुभाष जाधव सभापतीपदी विराजमान झाले… आणि इथूनच राजकीय संघर्षाची ठिणगी पडली.“बहुमत आमचं, सत्ता तुमची कशी?” हा सवाल राष्ट्रवादीच्या गोटात उघडपणे विचारला जाऊ लागला.

सामूहिक राजीनाम्यांमागचं राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे आणि तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीच्या 13 संचालकांनी एकाच वेळी राजीनामे दिले. हे केवळ राजीनामे नव्हते तर ती “राजकीय रणनीती” होती.

Maval APMC Dissolution Case News
Sugarcane Policy 2026: ऊस शेतकऱ्यांसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 60 वर्ष जुना नियम केला रद्द

प्रशासनाची एन्ट्री आणि मोठा धक्का

राजीनाम्यांनंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांनी बाजार समिती बरखास्त केली. आणि प्रशासक म्हणून नवनाथ अनपट यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे भाजप गोटात खळबळ उडाली.

Maval APMC Dissolution Case News
Shankar Mandekar News: मस्ती केली तर जिरवीन, कोणाच्या बापाला घाबरत नाही; भोरमध्ये मांडेकरांचा थोपटेंना इशारा

भाजपच्या पाच सदस्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. पण इथेच खेळ पलटला! न्यायालयाने प्रकरण हाताळण्याऐवजी स्पष्ट शब्दांत सांगितलं की “निर्णय मंत्रालय घेईल! आणि पणन मंत्र्यांना आदेश दिले. दोन आठवड्यांत सुनावणी घ्या.

Maval APMC Dissolution Case News
Maharashtra Govt Decision: शिक्षकांना मोठा दिलासा! सरकारचा निर्णय; UGC स्केल लागू, वेतन-DA मध्ये भरघोस वाढ

प्रतिष्ठेची लढाई!

२८ तारखेला उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप, सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांना मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हा दिवस मावळच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकतो. सध्या बाजार समितीचा कारभार प्रशासकांकडे आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे व्यवहार सुरू असले तरी…राजकीय वातावरण मात्र प्रचंड तापलं आहे. केवळ बाजार समिती नव्हे, प्रतिष्ठेची लढाई! हा वाद आता केवळ बाजार समितीपुरता मर्यादित राहिलेला नाही. राष्ट्रवादी vs भाजप प्रतिष्ठेची ही लढाई आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com