Baramati News: लोकसभा विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुन्हा एका मंचावर आले. कृषीप्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते एकत्र आले. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार याही सुप्रिया सुळे यांच्या शेजारील खूर्चीवर बसल्या होत्या.
बारामती येथे कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ऑक्सफर्डचे संचालक डॉ. अजित जावकर, नाबार्डचे व्यवस्थापक प्रदीप बाराते, डॉ. पियुष सोनी, डॉ. चक्रवर्ती, डॉ. महानंद माने, संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
लोकसभा,विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपानंतर काका-पुतण्या, नंणद-भावजय एकत्र येणार का? असा सवाल विचारण्यात येत होता. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने हे चारही नेते एका मंचावर आले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात आला.
यावेळी अजित पवार यांच्या सत्कार सुप्रिया सुळे करतील, असे संयोजकांनी माईकवरुन सांगितल्यानंतर अजित पवार यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. सुप्रिया सुळेंनी त्यांचा सत्कार केला. सुनेत्रा पवार यांचाही सत्कार सुळे यांच्या हस्ते झाले.
बारामती येथील शारदानगरमध्ये आयोजित कृषिकमुळे परिसर गजबजून गेला आहे. कृषी शास्त्रज्ञ, संशोधक, अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी या निमि्तातने शेतकऱ्यांना मिळाली आहे. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा केलेला वापर, शेती समस्यांवर तंत्रज्ञानाद्वारे मिळणार नवे उपाय. नामांकित कंपन्या, संस्थांची दालने भेटीला. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी स्वतंत्र स्टाॅल्स. याशिवाय जनावरांचे प्रदर्शन हे लक्षवेधी ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.