Saif Ali Khan Attacked : "हे सारं वांद्रा येथे घडलंय, सर्वाधिक सेलिब्रिटी तिथं राहतात...मग कोण सुरक्षित?" ठाकरेसेना आक्रमक

Priyanka Chaturvedi Slams Mumbai Police : "बाबा सिद्दीकींचं कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहत आहे. बाबा सिद्दीकींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सलमान खानला बुलेटप्रूफ घरात रहावं लागत आहे. आता सैफ अली खानवर हल्ला झाला," असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
Saif Ali Khan
Saif Ali KhanSarkarnama
Published on
Updated on

Saif Ali Khan Stabbed: पहाटेच्या वेळी अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्याने बॉलिवूड हादरलं आहे. अली सैफ अली याच्यावर झालेल्या हल्लाचा चित्रपट, राजकीय, सामाजिक क्षेत्रातून निषेध व्यक्त केला जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे, त्यानंतर ठाकरे सेनेच्या प्रवक्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे. प्रियंका चतुर्वेदींनी त्यांच्या X हॅण्डलवरुन याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.

Saif Ali Khan
Hindenburg Shut Down: गौतम अडाणींसह उद्योगविश्वाला अडचणीत आणणारी कंपनी बंद; संस्थापकांनी का घेतला हा निर्णय

"मुंबईत सेलिब्रिटीही सुरक्षित नसतील तर मग कोण सुरक्षित आहे?" असा सवाल प्रियंका यांनी उपस्थित केला आहे.

"बाबा सिद्दीकींचं कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहत आहे. बाबा सिद्दीकींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सलमान खानला बुलेटप्रूफ घरात रहावं लागत आहे. आता सैफ अली खानवर हल्ला झाला," असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.

Saif Ali Khan
Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्या, नवीन SIT; फडणवीस सरकार गाफील?

"हे सारं वांद्रा येथे घडलं आहे जिथे सर्वाधिक सेलिब्रिटी राहतात. या अशा परिसरामध्ये पुरेश्या प्रमाणात सुरक्षा असणं अपेक्षित आहे," असा उल्लेखही प्रियंका चतुर्वेदींनी केलं आहे.

"सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. ही घटना मागील काही दिवसांपासून घडलेल्या वेगवेगळ्या प्रकारानंतरची आहे.

पूर्वीच्या या हल्ल्यांमध्ये मुंबईमधील मोठ्या नावांना मुद्दाम लक्ष्य करण्यात आलं आहे," असं म्हणत मुंबई पोलिस, प्रशासनासह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चतुर्वेदींनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरुन टीका केली आहे.

"सैफ अली खानला लवकर बरं वाटू दे," असं त्यांनी पोस्टच्या अखेरीस म्हटलं आहे. वांद्रे येथील सैफ-करीनाच्या घरात मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका चोराने सैफ यांच्यावर हल्ला केला. चोराला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर चोराने चाकूने सहा वार केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. सैफ याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार करु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com