The Kundmala bridge accident scene where multiple lives, including a six-year-old, were tragically lost.  sarkarnama
पुणे

Kundmala Bridge Collapsed Update : कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या नावाची यादी समोर, सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश

Kundmala Accident Bridge Tragedy : नदीपात्रात कोसळलेला लोखंडी पूल क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे.

Roshan More

Kundmala Bridge Collapsed : रविवारचा वार हा पर्यटकांसाठी अपघातवार ठरला. मावळातील कुंडमळा येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये पर्यटकांच्या बचावासाठी सलग दुसऱ्या दिवशी एनडीआरएफकडून बचावकार्य राबवले जात आहे. दरम्यान, या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे समोर आली आहे. चार जणांचा मृत्यू झाला असून 51 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये चंद्रकांत साठले, रोहित माने, विहान माने यांचा समावेश असून एक जणाची ओळख पटलेली नाही. जखमी रुग्णांवर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

प्रशासनाकडून दिलेल्या माहितीप्रमाणे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी नदी वरील लोखंडी पूल रविवारी दुपारीस साडेतीनच्या सुमारास कोसळला. हा पूल सुमारे 30 वर्ष जुना होता. वर्षाविहारासाठी तब्बल 100 ते 125 पर्यटक या पूलावर आले असताना ही दुर्घटना घडली.

नदीपात्रात कोसळलेला लोखंडी पूल क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी रविवारी खासदार सुप्रिया सुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुनील शेळके यांनी भेट देत पाहणी केली. रात्री उशीरा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी भेट दिली.

पाच लाखांची मदत

पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. पूल नादुरुस्त होता. प्रशासनाच्या वतीने येथे पुलाचा वापर करू नये म्हणून फलक देखील लावले होते. मात्र, पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT