Kundamala Bridge Collapsed : तीन जण बेपत्ता? 51 जणांना वाचवण्यात यश, जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक; प्रशासनाच्या 'रेस्क्यू ऑपरेशन'ला पावसाचा अडथळा

Indrayani River Bridge Collapse Pune Administration Resumes Rescue Operation in Maval : पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत प्रशासनानं आज सकाळीच पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.
Kundamala Bridge Collapsed
Kundamala Bridge CollapsedSarkarnama
Published on
Updated on

Indrayani river bridge collapse : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, यात जखमी झालेल्या 40 पैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. काल दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेलं 'रेस्क्यू ऑपरेशन' काल रात्री 10 वाजता थांबविण्यात आलं.

पण ते आज सकाळीच सात वाजता पुन्हा एकदा 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरू करण्यात आलं. या दुर्घटनेत अजून तीन जण बेपत्ता असल्याचा अंदाज असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. परंतु काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानं पुणे प्रशासनाकडून आज सकाळी सुरू करण्यात येत असलेल्या 'रेस्क्यू ऑपरेशन'ला अडथळे निर्माण झाले आहेत.

पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 51 जणांना वाचविण्यात यश आले आहे. त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. या जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत तीन जण अजून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु कोणतीही मिसिंगची तक्रार प्राप्त नसल्याचं पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं. त्यांच्या शोध कार्यासाठी आज सकाळपासून पुणे प्रशासनानं 'रेस्क्यू ऑपरेशन' युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. परंतु पावसाचा (Rain) जोर वाढल्यानं 'रेस्क्यू ऑपरेशन'ला अडथळे निर्माण झाले आहेत.

Kundamala Bridge Collapsed
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मन विचलित करणारे फोटो, तुम्ही हळहळाल!

महायुती सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख आणि जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च करणार असल्याचे जाहीर केले. पर्यटन स्थळीं जाताना देखील पर्यटकांनी आपली स्वतःची काळजी घेऊनच पर्यटन करावे. हुल्लडबाजी किंवा धोकादायक पर्यटन करू नये असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. दरम्यान, राज्यातील सर्व पुलांचे लेखापरीक्षण करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Kundamala Bridge Collapsed
Devendra fadanvis : कुंडमळा दुर्घटनेतील मृत अन् जखमीबाबत सीएम फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती

या दुर्घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, राज्य सरकारशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेत करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. दरम्यान उद्धव ठाकरेंनी या दुर्घटनेनंतर राज्य सरकारवर टीका केली आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com