FIR sarkarnama
पुणे

Pune Land Scam : पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट, तिघांवर गुन्हा दाखल; निलंबित अधिकाऱ्याच्या अडचणी वाढल्या

FIR Digvijay Patil Sheetal Tejwani Ravindra Taru : मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Roshan More

Land Scam : पुण्यातील मुंढवा भागातील 40 एकर जमीनच्या गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या व्यवहारात सहा कोटींचे मुद्रांक शुल्क न भरता शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचा समावेश आहे. निलंबनानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तारु यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात येत होते. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसून, आजपर्यंत कोणत्याही नातेवाईकाच्या कामासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला मी कधीच फोन केलेला नाही, असे सांगितले.

संतोष हिंगाणे यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार, या व्यवहारत जमीनचे खरेदी-विक्री दस्त करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानग्या घेणे आवश्यक होते. तसेच 5 कोटी 89 लाख 31 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक असल्याना आरोपींनी मुद्रांक शुल्क भरले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दस्त नोंदणीत अनियमितता

या दस्त नोंदणीत गंभीर अनियमितता असून पक्षकारांनी शासनाला फसवत दस्तनोंदणी केल्याचे दिसून आले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत दस्तातील लिहून देणार यांचे "कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी आणि लिहून घेणार 'अॅमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी' कंपनीतर्फे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध तसेच त्यांना मदत करणाऱ्या दुय्यम निबंधक रविंद्र तारू याच्यावर फौजदारी कारवाई करावी," असे आदेश नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी सह जिल्हा निबंधकांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT