Bhandara News: माजी आमदार बाळा काशीवार यांची भाजपात पुन्हा एन्ट्री कशासाठी? मोठं कारण आलं समोर

BJP Politics : नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले भाजपचे माजी आमदार पुन्हा स्वगृही परतले आहेत.
Bala Kashiwar .jpg
Bala Kashiwar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News: नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले भाजपचे माजी आमदार पुन्हा स्वगृही परतले आहेत. त्यांच्या पत्नीला साकोली नगर पालिकेचे नगराध्यक्षपद देण्यात येणार असल्याची चर्चा यामुळे जिल्ह्यात सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री यांच्या समक्ष आणि आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात पुन्हा प्रवेश केला. दोन महिन्यांपासून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. ती खरी ठरली. आमदार फुके यांनीच त्यांना परत पक्षात घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकला होता. काशीवार जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतर साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

नाना पटोले (Nana Patole) यांना पराभूत करण्यासाठी भाजपने त्यांच्या ऐवजी परिणय फुके यांना उमेदवारी दिली होती. तेव्हापासून ते नाराज होते. मात्र पक्ष सोडला नव्हता. दरम्यान त्यांनी आपण आजारपणामुळे भाजपच्या राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. ते शासकीय कंत्राटदार असल्याने त्यांच्या पेंशनचा वाद निर्माण झाला होता. काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.

2024 च्या निवडणुकीपूर्वी बाळा काशीवार पुन्हा सक्रिय झाले होते. त्यांनी साकोली मतदारसंघावर दावाही केला होता. मात्र त्यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यांच्याऐवजी अविनाश ब्राम्हणकर यांना उमेदवारी देण्यात आली. ब्राम्हणकर आणि नाना पटोले यांच्यात चांगलाच चुरशीचा सामना रंगला होता.

Bala Kashiwar .jpg
Bihar Election Voting: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

ईव्हीएममध्ये ब्राम्हणकर निवडूनसुद्धा आले होते. मात्र, पोस्टल मतपत्रिकेने त्यांचा घात झाला. त्यांचा विजय हिरावला गेला. पक्षाने तिकीट नाकारल्याने आपला मोर्चा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळवला होता. त्यांचे कार्यकर्तेही शिवसेनेत सामील झाले होते. या घडामोडीचा फटका भाजपला बसला होता.

नाना पटोले यांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्याचे भाजपचे प्रयत्न फसले. बाळा काशीवार यांची योग्यवेळी भाजपने समजूत काढली असती, तर आज साकोली जिल्ह्यात वेगळे चित्र बघायला मिळाले असते असे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com