PCMC News:  Sarkarama
पुणे

PCMC Crime News: पिपंरीत पोलिसांचा वचक राहिला आहे? चार महिन्यात तब्बल २३ खून

PCMC News: गेल्या काही दिवसांत बलात्कार,घरफोड्या आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांतही मोठी वाढ झाली

उत्तम कुटे

PCMC Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत परवा (ता.१२) दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून करण्यात आला. त्यातील मारेकरी पकडले जाण्यापूर्वीच काल (ता.१३) आयुक्तालयात देहूरोडला आणखी एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाला. याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तीन वर्षाच्या मुलीचे डोके भिंतीवर आपटून तिला मारण्यात आले. एकूणच गेल्या काही दिवसांत शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून त्यातही सुरु असलेल्या खून सत्रामुळे पोलिस रडारवर आले आहेत. मावळातच नाही,तर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी शहरात दोन खूनांच्या जोडीने एक खूनाचा प्रयत्नही झाला.तर, परवा खूनासह एक बलात्काराचीही घटना घडली. ११ जून रोजी सुद्धा एक खूनी हल्ला, तर त्याअगोदरच्या दिवशी आयुक्तालयात एक खून आणि एक खूनाचा प्रयत्न झाला होता.दरररोज एक बलात्कार होत असून त्याजोडीने विनयभंगाचेही गुन्हे नोंदले जात आहेत.अंकुश शिंदेच्या बदलीनंतर विनयकुमार चौबे यांनी १४ डिसेंबर २००२ ला पोलिस आयुक्तपदाचा पदभार हाती घेतल्यापासून शहरातील खूनासारखे गंभीर गुन्हे वाढले आहेत. (PCMC Police)

तसेच ते आल्यानंतर बलात्कार,घरफोड्या आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांतही मोठी वाढ झाली आहे.जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात २३ खून झाले आहेत.तर,पहिल्या चार महिन्यात तब्बल १२१ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले.म्हणजे दररोज एक बलात्काराची घटना शहरात होत आहे.यातून महिलासंदर्भातील या सर्वात गंभीर गुन्ह्यात झालेली वाढही चिंता वाढविणारीच आहे.१६४ जबरी चोऱ्या (लुटमार) झाल्या असून त्यातील १०८ च उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आलेले आहे.चार महिन्यात १६० घरफोड्या झाल्या असून त्यापैकी फक्त ६० मधीलच आरोपी मिळाले आहेत.गतवर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या पहिल्या चार महिन्यात बलात्कार,घरफोड्या आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. (Crime News)

दुसरीकडे मावळातील खूनसत्र सुरुच आहे. तेथे गेल्या दोन महिन्यांत झालेल्या दोन राजकीय खूनांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यातून पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी स्थानिक शंका उपस्थित करू लागली आहे. खूनातील आरोपींना पकडावे म्हणून जनता रस्त्यावर उतरली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे (Kishor Aware) यांच्या १२ मे रोजी झालेल्या निर्घूण खूनातील मुख्य सूत्रधार आणि स्थानिक माजी नगरसेविकेच्या पतीला पोलिस अद्याप पकडू शकलेले नाहीत. म्हणून मृत आवारेंच्या मातोश्री आणि माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांना त्यासाठी काल उपोषणाचं हत्यार उपसावे लागले. दरम्यान आवारे खून प्रकरणातील एसआयटीच्या प्रमुख तथा एसीपी प्रेरणा कट्टे यांची अचानक बदली झाल्याने या तपासाला खीळ बसली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT