sambhajiraje chhatrapati | laxman hake.jpg sarkarnama
पुणे

Laxman Hake : राड्यामागे कुणाचा हात? हाकेंनी सगळंच सांगितलं; संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख करत डागली तोफ

Akshay Sabale

ओबीसी नेते, लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली. सोमवारी ( 30 सप्टेंबर ) कात्रज-कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आले असता हा राडा झाला. हाके यांनी मद्यसेवन केले असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला होता. यानंतर हा वादा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. मात्र, या राड्यामागे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती असल्याचा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांचा पुन्हा 'संभाजी भोसले,' असा उल्लेख करत एकेरी शब्दांत टीका केली आहे. तसेच, राजेशाही संपली असून लोकशाही आहे, असंही हाके यांनी म्हटलं आहे. हे भेकड आहे. तुमच्यात धमक असेल, तर आडवे या... पळून कशाला गेला, असं 'चॅलेजं'ही हाके यांनी मराठा आंदोलकांना दिलं आहे. हाके यांच्या दाव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आंदोलनाचा बदनाम करण्याचा डाव...

लक्ष्मण हाके म्हणाले, "अमित देशमाने आणि मते नावाच्या मुलांनी कुणा-कुणाला फोन लावले, याची माहिती घेतली, तर हा पूर्वनियोजित कट कसा होता? हे सगळ्यांना कळेल. ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव आहे."

आम्ही तुम्हाला राजा का मानवे हा प्रश्न होता?

"आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गादीला मानणारे आहोत. कोल्हापूरचा नेता रयतेचा राजा असता, तर ओबीसी आंदोलनाला भेट द्यायला असता, ही माफक अपेक्षा मी ओबीसी नेता म्हणून महाराष्ट्रासमोर मांडली होती. त्यास आम्ही तुम्हाला राजा का म्हणावे, हा प्रश्न कोल्हापूरच्या संभाजी भोसले नावाच्या नेत्याला विचारला. मला वाटले संभाजी भोसले नावाचा नेता खिलाडू वृत्तीनं घेईल, आत्मपरीक्षण करेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचा कारभार आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पाहिल. मात्र, या माणसाने माझ्या अंगावार मारेकरी घातले," अशी टीका हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केली.

तुमच्यात धमक असेल, तर आडवे या...

"संभाजी भोसलेच्या जाधव नावाच्या कार्यकर्त्यानं छगन भुजबळ यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला केला होता. हे भेकड आहेत. तुमच्या धमक असेल, तर आडवे या... पळून कशाला गेला... माझ्यावर मद्यसेवन केल्याचा आरोप करण्यात आला. पण, मी पोलिस ठाण्याय रक्ताचे नमुने दिले. भेकड असतो, तर पळू गेलो असतो. मी ओबीसींची लढाई कुठेही अर्ध्यावर सोडणार नाही. तुम्हाला तर अजिबात घाबरणार नाही," असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.

संभाजी भोसलेला राजा मानणार नाही...

"दम असता, तर एकटे-एकटे माझ्यासमोर आले असते. यासगळ्यामागे कोल्हापूरचा एक संभाजी भोसले नावाचा नेता आहे. आम्ही संभाजी भोसलेला राजा मानणार नाही. कारण, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज हे राजे होते. माझ्यावर हल्ला करायला लावणारा राजा कसा असू शकतो. हे कायद्याचं राज्य आहे. येथे लोकशाही आहे. राजेशाही कधीच संपली आहे," असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT