laxman hake
laxman hakesarkarnama

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी मद्यसेवन केले होते? वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर

Laxman Hake Latest News : ओबीसी नेते, लक्ष्मण हाके यांनी मद्यसेवन केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. यानंतर हाकेंची वैद्यकीय चाचणी करावी, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली होती.
Published on

Laxman Hake Case : ओबीसी नेते, लक्ष्मण हाके यांनी मद्यसेवन केल्याचा आरोप करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार कात्रज-कोंढवा परिसरात सोमवारी रात्री घडला. काही मराठा आंदोलकांनी हाके यांना जाब विचारला. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत हाके यांच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केली. मात्र, खरेच हाके यांनी मद्यसेवन केले होते का? याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

लक्ष्मण हाके यांची ससून रूग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात हाके यांनी मद्यसेवन केले नसल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. त्यासह हाके यांच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं घडलं काय?

हाके सोमवारी सायंकाळी पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात आले होते. हाके यांनी काही दिवसांपूर्वी मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत केलेल्या विधानावरून तरूणांनी त्यांना जाब विचारला. यावेळी काही तरूणांनी हाके यांनी मद्यसेवन केल्याचा आरोपही केला. त्यावरून हाके आणि मराठा आंदोलकांमधील वाद वाढला.

हा वाद कोंढवा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. पोलिस ठाण्यातही आवारातही रात्री उशिरापर्यंत गोंधळाचे वातावरण सुरू होते. पोलिसांनी आंदोलकांना कायदा हातात घेऊ नये, असं सांगत हाके यांची वैद्यकीय चाचणी करणार असल्यानं मान्य केलं.

रक्ताचे नमुने वैद्यकीय प्रयोगशाळेकडे...

त्यानंतर ससून रूग्णालयात हाके यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात हाके यांनी मद्यसेवन केले नसल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. आणखी खात्री करण्यासाठी हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन-दिवस लागू शकतात.

हाकेंवर गुन्हा नाही...

तसेच, हाके यांच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात नसल्याचं समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com