Laxman Hake Video : लक्ष्मण हाकेंचा मद्यप्राशन केल्याचा व्हिडिओ व्हायरल, शिवीगाळ केल्याचा आरोप

Laxman Hake drunk Video viral : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण लक्ष्मण हाके यांना घेरून 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा देताना दिसत आहेत. तसेच हाके यांची टिंगल करत त्यांना चिडवताना देखील दिसत आहेत.
Laxman Hake
Laxman Hake sarkarnama
Published on
Updated on

Laxman Hake News : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मद्यप्रशान केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हाके यांनी मद्यप्राशन करून शिविगाळ केल्याचा देखील आरोप केला जात आहे. कोंढवा परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण लक्ष्मण हाके यांना घेरून 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा देताना दिसत आहेत. तसेच हाके यांना चिडवताना देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये काही तरुण लक्ष्मण हाके यांना पाठलाग करत त्यांचा व्हिडिओ काढताना दिसत आहे. तसेच ओबीसी समाजासाठी लढा देणारे नेते असे कसे? असा सवाल देखील मराठा समाजाच्या कार्यकर्ते विचारत होते. हाके यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा समाजातील बांधवांनी केला आहे.पोलिसांना बोलवण्याची मागणी देखील व्हिडिओमध्ये काही तरुण करताना दिसत आहे.

हाकेंना तरुणांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. हाके यांची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी करण्यात येत होती. मराठा आंदोलक पोलिस ठाण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Laxman Hake
Congress News : काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, उद्यापासून सलग दहा दिवस मॅरेथॉन बैठका; इच्छुकांची धाकधूक वाढली

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते. मनोज जरांगे पाटील यांना विरोध करत लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका म्हणून उपोषण केले होते. नुकतेच मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषण करत असताना लक्ष्मण हाके यांनी देखील वडीगोद्रीमध्ये उपोषण केले होते.

Laxman Hake
Shivsena News : मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर; श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याच्या उमेदवारीला शिवसेनेतील 'या' बड्या नेत्याचा विरोध

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com