पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagta यांचे दीर्घ आजाराने काल (ता.३ जाने.) निधन झाले. त्यांना सर्वजण आदराने भाऊ म्हणत असत. कडक शिस्तीच्या भाऊंचादरारा एवढा होता की, त्यांचा फोन जरी गेला तरी अधिकारी चळचळा कापत असत, अशी आठवण भाजपचे युवा नेते अमित गोरखे यांनी आज `सरकारनामा`शी बोलताना सांगितली.
हेडमास्टर भाऊंमध्ये एक वाचकही दडलेला होता. व्यायामाचा मोठा छंद असलेल्या भाऊंना वाचनाचीही विशेष आवड होती. त्यातून त्यांच्या भाषणाची शैली बदलली होती, ते भाषणातून गोष्टी सांगू लागले होते, असे भाजपचे प्रदेश सचिव आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष गोरखे यांनी सांगितले.
तसेच अराजकीय कार्यक्रम असेल, तर ते त्यात राजकीय न बोलता सबंधित विषयावर मुद्देसूद बोलू लागले होते. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी सुद्धा त्यांचा मोठा स्नेह होता. त्यातूनच माझ्या कलारंग संस्थेच्या कार्यक्रमात नानांनी भाऊंना कडकडून आलिंगन दिले होते, अशी ह्रद्य आठवण गोरखेंनी सांगितली.
या कार्यक्रमात भाऊंनी राजकीय टोलेबाजी न करता, भाऊंनी सांस्कृतिक अंगानेभाषण केले. त्यामुळे त्याचे मोठे कौतुक वाटले होते. तसेच त्यानंतरच्या इतरही त्यांच्या भाषणात, ते गोष्टी सांगू लागले होते.म्हणून त्यांच्या या गोष्टीवेल्हाळ भाषणाच्या बदलत्या पद्धतीविषयी उत्सुकतेतून विचारणा केली असता, वाचन आणि त्यातही कथावाचन सुरु केल्याचे त्यांनी सांगितले होते, अशी आठवण गोरखे यांनी सांगितली.
भाऊंएवढा दरारा असलेला नेता उद्योगनगरीत नव्हता व सध्याही नाही,असे सांगत त्यांच्यात दडलेल्या हेडमास्टरविषयीही गोरखेंनी खुलासा केला. अभ्यास आणि माहिती असल्याने वा सबंधित विषयाची तांत्रिक माहिती घेऊनच ते बोलत असत. म्हणून त्यांचा फोन जरी गेला तरी अधिकारी चळचळा कापत होते, अशी आठवण गोरखेंनी सरकारनामाशी बोलताना जागवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.