Satara News : मी राजकारणात आल्यापासून काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिलो. माझे आदर्श यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan असून त्या काळात माझे संपूर्ण कुटुंब शेतकरी कामगार पक्षात काम करत होते. माझ्या आईनेदेखील ज्या पक्षात आहेस तो पक्ष, विचार व नेत्यांशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला होता. लोकसभेच्या पोटनिवडणूकीत माझे बंधू शेकापमधून उभे होते. मात्र, मी काँग्रेस विचाराशी एकनिष्ठ असल्याने मला भावाच्या विरोधात प्रचार करावा लागला, अशी आठवण खासदार शरद पवार MP Sharad Pawar यांनी आज साताऱ्यात सांगितली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त तसेच रयत शिक्षण संस्थेतील 50 वर्षांच्या सक्रिय योगदानाबद्दल अभिष्टचिंतन आणि कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते.
शरद पवार म्हणाले, माझ्या जीवनात साताऱ्याला विशेष स्थान आहे. कारण माझं कुटुंब मुळचे साताऱ्याचे असून काही कारणास्तव आम्हाला बारामतीला जावे लागेल. आम्ही तेथेच स्थायिक झालो. कोरेगाव तालुक्यातील आमचे गाव आहे. ज्यावेळी मी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राजकिय क्षेत्राच्या सुरवातीच्या काळात यशवंतराव चव्हाण हेच आमचे आदर्श होते.
त्यावेळी घरातील सगळे शेतकरी कामगार पक्षात होते आणि मी एकटाच काँग्रेस पक्षात होतो. त्यावेळी मला आईने तू काँग्रेस पक्षातच रहा, असे सांगून पक्षाचा विचार, नेता आणि पक्षाशी प्रामाणिक रहा, असे सांगितले होते. त्यावेळी लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती. आमचे मोठे बंधू वसंतराव यांना उमेदवारी दिली गेली.
त्यावेळी सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात संयुक्त समितीचे वातावरण होते. या निवडणूकीत बंधू शेकापचे उमेदवार असल्याने माझी कुचंबणा झाली. पण, मला आईने सांगितले की तु पक्षाशी व पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी प्रामाणिक राहून काम कर, असे सांगितले. त्यामुळे मला बंधूंच्या विरोधात काम करण्याचा प्रसंग आला, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.