Dilip Mohite News in Marathi, Vidhan Parishad election 2022 News
Dilip Mohite News in Marathi, Vidhan Parishad election 2022 News sarkarnama
पुणे

दिलीप मोहितेंचा रूसवा जाईना; ‘त्या’ दोन नेत्यांना भेटून मतदानाचा निर्णय घेणार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खेडचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांचा राग काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली तरी त्यांचा मतदानाबाबत निर्णय झालेला नाही. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना भेटून विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election) मतदानाबाबत ठरविणार आहे. तसेच, हे नेते फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत, असा घरचा आहेर आमदार मोहिते यांनी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांना दिला आहे. (Legislative Council Election : Ajit Pawar, Jayant Patil's Will Meet and Decide on Voting : Dilip Mohite)

विधान परिषदेच्या १० जागांसाठी मुंबई विधीमंडळात मतदान सुरू आहे. भाजपच्या जवळपास १०४ आमदारांनी मतदान केले आहे. लक्ष्मण जगताप आणि सुधीर मुनगंटीवार हे दोघे मतदानाचे बाकी आहेत. इकडे महाविकास आघाडीत मात्र रुसवे फुगवे कायम आहेत. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना पहिली पसंती दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आघाडीतील आमदारांमध्ये धूसफूस कायम आहे. खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांची नाराजी अजूनही कायम आहे. मतदानाचा निर्णय त्यांनी अजूनही घेतलेला नाही, त्यामुळे पक्षश्रेष्ठींना त्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ येणार आहे. (Dilip Mohite News in Marathi)

आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीतील मतदानाबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुंबईत गेल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून मतदान करायचे की नाही याबाबत ठरवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पण त्यानंतरही काही हालचाली झालेल्या दिसत नाहीत. एका दिवसात होणारी कामं अजून रखडली आहेत. (Vidhan Parishad election 2022 News)

माझ्या खेड मतदारसंघातील कामे थांबवली आहेत. विधान परिषद निवडणुकीआधी ती केली जातील, असे सांगितले होते. पण, ती अद्याप झाली नाहीत. त्याबाबात आता अजित पवारांची भेट घेऊन विचारणा करणार आहे. त्यानंतर अन्य नेत्यांशी बोलून निर्णय घेईन. पण, मी नाराजच आहे, असे मोहिते यांनी स्पष्ट केले.

राज्यसभा निवडणुकीनंतर चित्र पालटेल, असं वाटलं होतं. पण, त्या निवडणुकीत फटका बसूनही काहीही झालेलं नाही. हे नेते फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. बाकी आमचा सवतासुभा कायम आहे, असे सांगून स्थानिक पातळीवर शिवसेना संघर्ष चालूच राहण्याचे संकेत आमदार दिलीप मोहिते यांनी दिले आहेत. ते पुढे म्हणाले की, आमच्या कामासंदर्भात सत्तेच्या प्रमुखांनी विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT