Ketan Agrawal Murder Case : लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपणार असल्याने या दोन्ही आरोपींना आज वडगाव मावळ न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
एकीकडे या आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ होणार का? न्यायलय नेमके काय आदेश देणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. तर दुसरीकडे या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सिया गोयल संदर्भात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुसाले समोर येत आहेत. अशातच आता सिया गोयलचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.
सिया आणि केतन हे प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. तर त्यांच्या या प्रवासात सियाला पुण्यातून विमानतळापर्यंत सोडणाऱ्या वाहनाचा चालकाने आता सियाबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. ड्रायव्हर वैभव जाधव याने सांगितलं की, प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाताना त्यांनी पुण्यातून एक गाडी बुक केली होती.
बालीला जाण्यासाठी सिया तयार नव्हती ती गाडीत सुद्धा बसायला तयार नव्हती म्हणून तिचा भाऊ साहिलने तिला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि या बहीण-भावाचे पुणे ते रावेत दरम्यान गाडीमध्ये वाद झाल्याचा खुलासा ड्रायव्हरने केला आहे. दरम्यान, पुढे गेल्यावर याच गाडीत केतन आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने गाडी रवाना झाली. रस्त्यात एका फूड कोर्टवर सगळे नाश्त्यासाठी थांबले होते.
त्यावेळी सिया कशाच्या तरी निमित्ताने पुन्हा गाडीकडे आली आणि गाडीतील काही सामान काढून खिशात ठेवलं. ही सर्व घटना ड्रायव्हरने बघितली होती. त्यानंतर ड्रायव्हरने त्यांना मुंबई विमानतळावर सोडलं आणि तो मागे यायला लागला. तेव्हा त्याला केतनचा फोन आला आणि माझा पासपोर्ट राहिल्याचं सांगितलं. पण गाडीत पासपोर्ट नसल्यामुळे ड्रायव्हरला सियाने तो पासपोर्ट फूड कोर्ट वरच काढून घेतल्याची बाब नजरेस आली होती. त्यामुळे आता बालीला जाण्याचा प्लॅन सियामुळेच रद्द झाला.
तिने पासपोर्ट मुद्दाम लपवल्याचंही समोर आलं आहे. या सर्व घटना उघडकीस आल्याने आता सियाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना लोहगड किल्ल्यावर ज्या ठिकाणी केतनला खाली ढकललं त्या पॉईंटवर नेऊन पोलिसांनी 'सीन रीक्रिएशन' केलं आहे. यानंतर आता सिया आणि चेतनची पोलिसांनी समोरासमोर चौकशी केली आहे. त्यामुळे आज पोलीस न्यायलयात नेमकी काय माहिती सादर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.