Police investigation into the Lohagad murder case has revealed that accused Siya Goyal allegedly studied the Sonam Raghuvanshi murder case before the incident. The investigation continues as new evidence emerges. Sarkarnama
पुणे

Lohagad Murder Case : केतनच्या हत्येपूर्वी सियाकडून देशभरात गाजलेल्या 'हनिमून मर्डर केस'चा अभ्यास; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Sonam Raghuvanshi Murder Case : सिया गोयलबाबत आणखी एक धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. ती म्हणजे, सियाने केतन अग्रवालची हत्या करण्यापूर्वी देशातील बहुचर्चित 'हनिमून मर्डर केस'मधील सोनम रघुवंशीच्या हत्येच्या प्रकरणाचा अभ्यास केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Jagdish Patil

Lohagad Murder Case : लोहगड किल्ल्यावरून आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून त्याची हत्या केल्याच्या आरोपा प्रकरणी पुण्यातील सिया गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. एकीकडे सियाने तिच्या घरच्यांसह होणाऱ्या पतीपासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्याचं तपासातून समोर येत आहे.

अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. ती म्हणजे, सियाने केतन अग्रवालची हत्या करण्यापूर्वी देशातील बहुचर्चित 'हनिमून मर्डर केस'मधील सोनम रघुवंशीच्या हत्येच्या प्रकरणाचा अभ्यास केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

सोनम रघुवंशीने आपल्या नवऱ्याची हत्या कशी केली, हत्येनंतर तिने नेमक्या काय चुका केल्या? याबाबतची सगळी माहिती सियाने वाचली होती. या संदर्भातील बातम्या वाचून तिने या प्रकरणाची माहिती आणि संपूर्ण घटनाक्रम व्यवस्थित जाणून घेतला होता, असं पोलिसांनी सांगितलं.

सोनम रघुवंशी हत्या प्रकरण नेमकं काय?

सोनम रघुवंशी नावाची महिला तिचा पती राजा रघुवंशी याच्यासोबत मेघालयला हनिमूनसाठी गेली होती. यावेळी ती पती राजा याला मेघालयमधील एका एका उंच शिखरावर घेऊन गेली होती. तिथे तिने पतीवर वार केले आणि त्याला खाली ढकलून दिलं होतं.

या हत्येत तिला तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांनी मदत केली होती. त्यानंतर, काही दिवसांनी रघुवंशीचा मृतदेह सापडला आणि सोनमने केलेली हत्या उघडकीस आली. हे सर्व प्रकरण सिया गोयलने अभ्यासलं होतं.

तर केतन अग्रवालला लोहगडावरुन ढकलून देण्यापूर्वी सिया आणि तिचा प्रियकर चेतनने सोनमने राजा रघुवंशीची हत्या करताना काय काय केलं तोच घटनाक्रम अभ्यासला आणि सोनमने केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सिया सध्या न्यायालयीन कोठडीत असून तिच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघांच्या व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे पोलिसांनी हा दावा केल्याचं सागितलं जात आहे. त्यामुळे सिया आणि चेतनाचा पाय खूप खोलात असल्याचं आता हळूहळू समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT