Ravindra Dhangekar Meet Sunetra Pawar sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar Meet Sunetra Pawar : सुनेत्रा पवार अन् धंगेकरांची तळजाई टेकडीवर भेट; काय झाली चर्चा?

Baramati Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पुण्यालगतच्या परिसरांमध्ये प्रचार करताना दिसत आहेत.

Sudesh Mitkar

आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवरती बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराला वेग आलेला आहे. उमेदवारांकडून वैयक्तिक गाठीभेटी आणि मेळाव्यांचा धडाका लावण्यात आलेला आहे. याच प्रचाराच्या धामधुमीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) आणि पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) हे रविवारी ( 7 एप्रिल ) सकाळी तळजाई टेकडी येथे समोरासमोर आले. यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत गप्पागोष्टी केल्या. सध्या राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर, असे सुसंस्कृत राजकारणाचे चित्र देखील पाहायला मिळालं.

पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवारांच्या घोषणा महायुती आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. सर्वच उमेदवार या पहिल्या टप्प्यात पुणे शहर आणि शहरा लगतच्या परिसरात येणाऱ्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार दौरे करताना दिसत आहेत. बारामती मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये शहरातील बहुतांश भाग येतो. लोकसभेचा विचार करता या भागामध्ये सर्वाधिक मतदार असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बारामतीमधील उमेदवार करताना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) या दोन्ही उमेदवार सध्या सातत्याने बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पुण्यालगतच्या परिसरांमध्ये प्रचार करताना दिसत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यादेखील पुणे शहरालगतच्या भागांमध्ये प्रचार करताना दिसत आहेत. यादरम्यान त्या विविध सोसायटीमध्ये नागरिकांसोबत संवाद साधत आहेत.

रविवारी सुनेत्रा पवार खडकवासला मतदारसंघात येणाऱ्या तळजाई टेकडी या परिसरामध्ये प्रचारासाठी पोचल्या होत्या. याचदरम्यान महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) हे देखील याच परिसरात प्रचारासाठी आले असता दोन्ही उमेदवारांची यावेळी भेट झाली. यावेळी दोन्ही उमेदवारांनी चर्चा करत एकमेकांना निवडणुकीसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकामेकांशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांसोबत अनेकांनी तळजाई टेकडीवर फोटो काढले.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, उल्हास पवार, दत्ता धनकवडे, आप्पा रेणुसे, सुभाष जगताप, अशोक हरणावळ यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT