Sunetra Pawar News : 'मोदी विकासपुरुष, तर अजितदादा विकासाचे पाईक!'

Baramati Lok Sabha Constituency : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभेतील खडकवासला विधानसभेत सुनेत्रा पवारांनी विकासाला मत देण्याचे आवाहन केले.
Narendra Modi, Ajit Pawar, Sunetra Pawar
Narendra Modi, Ajit Pawar, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोण कोण आमने-सामने असणारे हे स्पष्ट झाल्याने प्रचाराला वेग आला आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. त्यानंतर त्या प्रथमच रविवारी (ता. ३१) खडकवासला येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्रे मोदी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. Sunetra Pawar News

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे जगभरामध्ये त्यांना विकासपुरुष म्हणून ओळखले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाचा दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. आता या विकासाचा धागा पकडत अजित पवारांनीही (Ajit Pawar) त्या विकासाचे पाईक होण्याचा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi, Ajit Pawar, Sunetra Pawar
Solapur Loksabha Constituency : प्रणिती शिंदेंचे आरोप शहिदांचे अपमान करणारे; राम सातपुते यांचे प्रत्युत्तर

महायुतीचा भाग म्हणून आपण लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असताना वेगवेगळ्या चिन्हावरती या निवडणुका होणार आहे. बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात घड्याळ चिन्ह असणार आहे. घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत आणि विकासाला मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत असणार आहे, असेही सुनेत्रा पवारांनी आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माध्यमातून सोसायटी कनेक्ट हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून तुमच्या असलेल्या समस्या या सोसायटी कनेक्टच्या माध्यमातून सुटणार आहेत. सोसायटी कनेक्टला एक अर्ज दिल्यानंतर 45 दिवसांत तुमची समस्या सोडवण्याची जबाबदारी आमची असल्याचे पवार यांनी सांगितले. पुणे शहरात परिसरातील पाण्याचे समस्या मोठी आहे. उपमुख्यमंत्री पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्दही सुनेत्रा पवारांनी यावेळी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

Narendra Modi, Ajit Pawar, Sunetra Pawar
Ex MLA Narayan Gavhankar : भाजपचे माजी आमदार पक्षाविरुद्ध बंडाचं निशाण फडकवणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com